काय ? तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितात? वाचा, ‘मि. इंडिया’चा झक्कास रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 10:37 AM2021-09-16T10:37:26+5:302021-09-16T10:38:16+5:30

बॉलिवूडचे सर्वाधिक फिट अभिनेते म्हणून अनिल कपूर यांना ओळखलं जातं. पण चाहते काय विचार करतील, याचा नेम नाही...

anil kapoor answers to a troll who said he drinks snake blood to look young | काय ? तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितात? वाचा, ‘मि. इंडिया’चा झक्कास रिप्लाय

काय ? तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितात? वाचा, ‘मि. इंडिया’चा झक्कास रिप्लाय

Next
ठळक मुद्देलॉकडाउनमध्ये अनिल कपूर यांनी वर्कआऊट करतानाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

म्हणायला अनिल कपूर  (Anil Kapoor) 64 वर्षांचे आहेत. पण चेह-यावरून त्यांच्या या वयाचा अंदाजच येत नाही. बॉलिवूडचे सर्वाधिक फिट अभिनेते म्हणून अनिल कपूर यांना ओळखलं जातं. रोज अगदी न चुकता 4-4 तास व्यायाम, पौष्टिक आहार आणि सकारात्मकता या जोरावर या वयातही ‘तरूण’ दिसण्याची किमया त्यांनी साधली आहे. पण चाहते काय विचार करतील, याचा नेम नाही. काहींच्या मते, इतकं तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर प्लास्टिक सर्जन सोबत घेऊन फिरतात, तर काहींच्या मते, ते चक्क सापाचे रक्त पितात.... आता यावर अनिल कपूर यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे.

अलीकडे अनिल कपूर यांनी अरबाज खानच्या (Arbaaz Khan) ‘पिंच 2’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी अरबाजने अनिल कपूर यांना चाहत्यांचे अनेक व्हिडीओ दाखवले. काही ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचून दाखवल्या. अनिल कपूरच्या फिटनेसवर सोशल मीडियावर काय काय चर्चा होतात, लोक काय काय अंदाज बांधतात, हे अनिल कपूर यांना कळावं हा यामागचा उद्देश.

‘अनिल कपूर यांना ब्रह्मदेवाकडून तरूण दिसण्याचं वरदान मिळालं आहे,’ असं एक चाहता एका व्हिडीओत म्हणाला. तर अन्य एक युजरच्या मते, तरूण दिसण्यासाठी अनिल कपूर सतत एक प्लास्टिक सर्जन सोबत घेऊन फिरतात आणि सापाचे रक्त पितात.
हे मजेदार व्हिडीओ पाहून अनिल कपूर यांना हसू आवरलं नाही. पण चाहत्यांच्या या कमेंट्सला त्यांनी अगदी शांतपणे उत्तर दिलं. मला वाटतं, ज्यांच्याबद्दल माहित नाही, त्यांच्याबद्दल बोलू नये, असं ते म्हणाले.
 तरुण दिसण्यासाठी सापाचे रक्त पितात असे म्हणणा-या यूजरलाही त्यांनी उत्तर दिलं. ‘प्रेक्षक इतके पैसे खर्च करुन आम्हाला पाहण्यासाठी येतात आणि जर आम्ही चांगले दिसलो नाही तर प्रेक्षक आम्हाला का पाहतील?,’ असं ते म्हणाले. 
 

Web Title: anil kapoor answers to a troll who said he drinks snake blood to look young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app