ठळक मुद्देकाही नाती शेवटपर्यंत टिकून राहातात तर काही नाती काही काळापुरताच मर्यादित असतात. नोरा ही खूपच चांगली मुलगी आहे. ती सध्या खूपच चांगल्या भूमिका साकारत असून ती लवकरच खूपच मोठी स्टार होईल. माझ्या शुभेच्छा नेहमीच तिच्यासोबत आहेत.

अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांनी काही वर्षांपूर्वी लग्न करत त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांना आता एक क्यूट मुलगी असून त्यांच्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात. अंगद बेदी हा देखील अभिनेता असून त्याने उंगली, पिंक, डिअर जिंदगी, सुरमा, टायगर जिंदा है यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा झोया फॅक्टर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच जान्हवी कपूरच्या कारगिल गर्ल या चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अंगद बेदीचे नेहासोबत लग्न होण्याआधी तो एका अभिनेत्रीसोबत नात्यात होता, त्यानेच या गोष्टीची कबुली नुकतीच दिली आहे. अंगद आणि नोरा फतेही यांच्या अफेअरची चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात झाली होती. पण त्या दोघांनी त्यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता नुकत्याच दिलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत नोरा आणि अंगदच्या नात्याविषयी अंगदने सांगितले आहे. एवढेच नव्हे तर नोराचे त्याने तोंडभरून कौतुक केले आहे. ती एक स्टार असल्याचे त्याने या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, काही नाती शेवटपर्यंत टिकून राहातात तर काही नाती काही काळापुरताच मर्यादित असतात. नोरा ही खूपच चांगली मुलगी आहे. ती सध्या खूपच चांगल्या भूमिका साकारत असून ती लवकरच खूपच मोठी स्टार होईल. माझ्या शुभेच्छा नेहमीच तिच्यासोबत आहेत.

अभिनेत्री नेहा धूपियाने गेल्या १० मे रोजी अंगद बेदीसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. नेहा आणि अंगद अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. खरे तर चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा आणि अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली होती. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.


Web Title: Angad Bedi is All Praise for Ex-flame Nora Fatehi, Calls Her 'A Star In the Making'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.