रवींद्र मोरे 

यंदा बॉलिवूड बऱ्याच वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिले. कधी कोणावर लैंगिक शोषणाचे आरोप लागले तर कधी कोणाला जेलची हवा खावी लागली. काही चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले तर काही चित्रपटांवर स्क्रिप्ट चोरी करण्याचा आरोप लावला गेला. या व्यतिरिक्त काही स्टार्स सेक्स रॅकेटमध्येही फसल्याची चर्चा ऐकण्यात आली. आज आपण अशाच काही गोष्टींबाबत जाणून घेऊया ज्यामुळे बॉलिवूड हादरले गेले.  

* #MeToo मोहीम 
मीटू मोहिमेची आग बॉलिवूडमध्ये अशी लागली, त्यात कित्येक दिग्गज स्टार्स होरपळले गेले. मीटू मोहिमेच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत तनुश्री दत्ताने अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला. एका टिव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने अभिनेता नाना पाटेकरांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. तिने सांगितले की, चित्रपट हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर गाण्याच्या शूटिंगदरम्यान अगोदर नानाने अभद्र वागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तनुश्रीने नानाची तक्रार कोरिओग्राफर गणेश आचार्य, प्रोड्यूसर आणि डायरेक्टरकडे केली, तर त्यांनी नानासोबत इंटीमेट सीन टाकून दिले. तनुश्रीच्या या खुलाशानंतर जणू बॉलिवूडमध्ये भूकंपच आला. अशा प्रकारच्या आरोपांमध्ये नानांव्यतिरिक्त साजिद खान, आलोक नाथ, विवेक अग्निहोत्री असे बरेच अ‍ॅक्टर्स ओढले गेले. 

* सेक्स रॅकेटमध्ये अडकली अभिनेत्री
काही अ‍ॅक्टेस सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या. श्वेता बसु प्रसाद आणि साउथची फेमस अ‍ॅक्ट्रेस संगीता बालन हिचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. संगीतावर आरोप आहे की, ती पानायुपरच्या प्रायव्हेट रिझॉर्टमध्ये चाललेल्या सेक्स रॅकेटमध्ये सहभागी होती. तर श्वेता प्रसादचे नाव २०१४ मध्ये हैदराबाद मधील सेक्स रॅकेटमध्ये समोर आले होते. श्वेता बसु प्रसादने ब्वॉयफ्रेंड आणि चित्रपट मेकर रोहित मित्तलसोबत १३ डिसेंबर रोजी लग्न करुन संसार थाटून घेतला.  

* स्क्रिप्ट चोरण्याचा आरोप
यंदा काही चित्रपटांवर डायलॉग चोरी करण्याचा आरोप लागला तर काहींवर स्क्रिप्ट चोरण्याचा. इमरान हाशमीचा अपकमिंग चित्रपट ‘चीट इंडिया’वर दिल्ली बेस्ड लेखक दिनेश गौरम आणि अ‍ॅक्टर इमरान जैदने इमरान हाशमीच्या प्रोडक्शन कंपनीवर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरण्याचा आरोप लावला होता. या शिवाय अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ वरही आरोप लावण्यात आला होता. रिपु दमन जैसवाल यांनी चित्रपटाचे काही सीन्स त्यांनी लिहिलेल्या कहाणीद्वारा चोरण्याचा आरोप लावला होता. तसेच कंगणा राणौतचा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ  झांसी' वरही डायलॉग चोरण्याचा आरोप लावला गेला आहे. असे म्हटले जात आहे की, 'मणिकर्णिका' चित्रपटाचे डायलॉग ऋतिक रोशनचा चित्रपट 'मोहनजोदड़ो’शी मिळते-जुळते आहेत.   

* रिलीजच्या अगोदरच लिक झाले चित्रपट
यंदा बरेच चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले. आमिर खानचा चित्रपट 'ठग्स ऑफ  हिंदोस्तान', साउथचा सुपरहिट चित्रपट 'सरकार', मल्याळ सुपरस्टार मोहनलालचा चित्रपट 'ड्रामा' हे लीक झाले होते. हे चित्रपट ऑनलाइन लिक झाल्याने चित्रपटांच्या कमाईवर अनिष्ट परिणाम झाला.  

* स्टार्सने खाल्ली जेलची हवा 
काळविट शिकार प्रकरणी तब्बू, सैफ, सोनाली ब्रेंद्रे आणि नीलम यांना आरोपातून मुक्त करण्यात आले होते, मात्र सलमान खानला पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. कोर्टाद्वारे शिक्षा जाहीर होताच सलमानला जेलमध्ये जावे लागले आणि काही तास त्याला तिथे थांबावे लागले होते. सध्या सलमानला जामिनावर सुटका मिळाली आहे आणि कोर्टात केस सुरु आहे. सलमान व्यतिरिक्त मीका सिंहलाही यावर्षी जेलची हवा खावी लागली. मीकावर १७ वर्षीय ब्राझिलियन तरुणीने लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. 

Web Title: And Bollywood 'shook' these things!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.