Ananya Panday used to think her name was f word reveals interesting story in the fabulous lives of bollywood wives | असं कुठं असतंय? अनन्याला बालपणी वाटायचं तिचं नाव होतं ****, स्वत:च सांगितला मजेदार किस्सा...

असं कुठं असतंय? अनन्याला बालपणी वाटायचं तिचं नाव होतं ****, स्वत:च सांगितला मजेदार किस्सा...

अनन्या पांडेने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफद द इअर २'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. पण फिल्मी बॅकग्राउंड असल्याने ती सिनेमात येण्याआधीपासूनच स्पॉटलाइटमध्ये होती. महीप, संजय कपूरची मुलगी शनाया आणि शाहरूख खानची मुलगी अनन्याची बेस्ट फ्रेन्ड आहेत. The Fabulous Lives Of Bollywood Wives वेब शो रिलीज झाला असून यामुळे अनन्या पांडे आणि तिची आई भावना पांडे चर्चेत आहे.

या वेब शोमध्ये भावनासोबत महीप कपूर, नीलम कोठारी आणि सीमा खानची लाइफ दाखवण्यात आली आहे. अनन्या सुद्धा यात थोड्या वेळासाठी दिसते. यात तिने तिच्या बालपणीचा एक मजेदार किस्सा शेअर केलाय.

अनन्याने सांगितले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिला वाटत होतं की, तिचं नाव F**k (शिवी) आहे. कारण तिचे पॅरेंट्स हा शब्द पुन्हा पुन्हा बोलत होते. तेच तिची आई भावना यावर म्हणते की, ती कधीही असे शब्द बोलत नव्हते.

तर दुसरीकडे अनन्याच्या जन्माशी निगडीत आणखी एक इंटरेस्टींग किस्सा समोर आला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत तिची आई भावनाने सांगितले होते की, त्यांचं लग्न जानेवारी १९९८ मध्ये झालं होतं. अनन्या त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये जन्माला आली होती. ती 'हनीमून बेबी' आहे. लोक हेच विचार करत होते की, ती लग्नाच्या आधीतर गर्भवती नव्हती ना. भावनाने सांगितले होते की, अनन्या तिच्यासोबत पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीपासून आहे.

अनन्याचे वडील चंकी पांडे कधीकाळी मोठा कलाकार होता. तो अजूनही सिनेमांमध्ये अॅक्टिव आहे. त्याने एक इंटरेस्टींग गोष्ट सांगितली होती की जेव्हा अनन्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला तेव्हा मुद्दामहून तिथे गेला नव्हता. कारण याबाबतीत तो स्वत:ला शापित मानतो. कारण त्याला ३४ वर्षांच्या करिअरमध्ये कधीच अवॉर्ड मिळाला नाही.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ananya Panday used to think her name was f word reveals interesting story in the fabulous lives of bollywood wives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.