Amitabh Bachchan thinking about retirement says head thinking something fingers something else | अमिताभ बच्चन घेणारेत का रिटायरमेंट? ब्लॉगमधून दिले हे संकेत

अमिताभ बच्चन घेणारेत का रिटायरमेंट? ब्लॉगमधून दिले हे संकेत

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या ५० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी १९६९मध्ये सात हिंदुस्तानी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून सलग ५० वर्षे ब्रेक न घेता ते काम करत आहेत. मात्र आता वाढत्या वयामुळे त्यांना त्रास होऊ लागला आहे. अशात आता ते रिटायर होण्याचा विचार करत आहेत. या गोष्टीचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे.


सध्या अमिताभ बच्चन ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनाली येथे गेले आहेत. तिथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल लिहिलं की, मला इथे छोट्याशा पण् सुंदर ठिकाणी गाडीने पोहचण्यासाठी १२ तास लागले. इथले रोड चांगले नाहीत. रूम व वातावरही वेगळे आहे. आता मला रिटायर व्हायला लागेल. माझं डोक कुठे दुसऱ्या ठिकाणी आहे आणि मी उंगल्या काही वेगळ्या करतो आहे. हा एक मेसेज आहे.


ब्रह्मास्त्र चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर व आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. नुकतेच कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग संपवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मनालीमध्ये येण्यासाठी निघाले. तिथे ते ब्रह्मास्त्रचे क्लाइमॅक्स चित्रीत करणार आहेत.


ब्रह्मास्त्र चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन यांच्याकडे झुंड, गुलाबो सिताबो, बटरफ्लाई (कन्नड), एबी आणि सीडी (मराठी), उयरनधा आणि चेहरे या चित्रपटात झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amitabh Bachchan thinking about retirement says head thinking something fingers something else

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.