बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन लवकरच आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत बॉलिवूडचा सीरियल किसर अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इमरान आणि अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाचे टायटलची देखील घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी इमरान व अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे नाव 'चेहरे' असे ठेवले आहे. 

'चेहरे' चित्रपटाच्या निर्मात्यांनी शीर्षकाची घोषणा करीत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात चित्रपटातील स्टारकास्ट पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद पंडित करत आहेत. तर मोशन पिक्चर्स व सरस्वती एण्टरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.


तर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर 'चेहरे' चित्रपटाच्या शूटिंग सुरू करत असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. त्यासोबतच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निर्माते आनंद पंडित, अभिनेता इमरान हाश्मी, स्वतः अमिताभ बच्चन दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी म्हटले की, 'बऱ्याच कालावधीपासूनचे कमिटमेंट आज पूर्ण झाले. या पोस्टसोबत त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील सांगितली.'


'चेहरे' हा सिनेमा २१ फेब्रुवारी, २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्रिती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, अन्नू कपूर व रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व इमरान हाश्मी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणे कमालीचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Amitabh Bachchan for the first time started working with this Bollywood actor, started shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.