अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 11:37 AM2021-03-01T11:37:52+5:302021-03-01T11:38:15+5:30

Amitabh Bachchan Health Update : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सर्जरी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Amitabh Bachchan expresses 'gratitude, love for concern and wishes' after undergoing surgery |  अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक

 अमिताभ बच्चन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, चाहत्यांच्या प्रेमाने झाले भावूक

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी रात्री लिहिलेल्या ब्लॉगमधून अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. शनिवारी अमिताभ यांनी केवळ एक ओळीचा ब्लॉग लिहिला होता.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सर्जरी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मेडिकल कंडिशन, सर्जरी, कान्ट राईट... अशा अमिताभ यांच्या एक ओळीच्या ब्लॉगने चाहते चिंताग्रस्त झाले होते. 79 वर्षीय अमिताभ यांना काय झाले होते? त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? ते कोणत्या रूग्णालयात आहेत? हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. तर अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे आणि सर्जरीनंतर ते घरी विश्रांती घेत आहेत.
अमिताभ यांच्यावर सर्जरी होणार, हे कळताच चाहत्यांनी प्रार्थना सुरु केल्या होत्या. अमिताभ यांनी या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. आपल्या ब्लॉगवर एक छोटीशी पोस्ट लिहित त्यानी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘माझ्याबद्दलची चिंता आणि माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी आभार आणि प्रेम... या वयात डोळ्याची सर्जरी नाजूक असते...’ असे त्यांनी लिहिले. या ब्लॉगसोबत त्यांनी स्वत:चा एक फोटोही शेअर केला.

अमिताभ यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया!
आयएएनएस न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांत बिग बी घरी परतले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. 

शनिवारी रात्री लिहिलेल्या ब्लॉगमधून अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. शनिवारी अमिताभ यांनी केवळ एक ओळीचा ब्लॉग लिहिला होता.  ‘मेडिकल कंडिशन...सर्जरी... आणखी जास्त मी लिहू शकत नाही, एबी...’, असे त्यांनी लिहिले होते. ट्विटर आणि इन्स्टाग्राम पोस्टनेही चाहत्यांच्या चिंतेत भर घातली होती. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्रश्नार्थक चिन्ह तेवढी लिहिली होती. त्यांची अन्य एक ट्विटर पोस्टही गूढ वाढवणारी होती.‘कुछ जरूरत से ज्यादा बढ गया है, कुछ काटने पर सुधरने वाला है... जीवन काल का कल है ये, कल ही पता चलेगा कैसे रहे वे...,’ असे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते.

Web Title: Amitabh Bachchan expresses 'gratitude, love for concern and wishes' after undergoing surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.