वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:25 AM2021-10-12T10:25:51+5:302021-10-12T10:26:10+5:30

Amitabh bachchan : बिग बी कायमच त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, सामान्यांच्या गर्दीपासून दूर फक्त आपल्या कुटुंबासोबतच वाढदिवस साजरा करतात.

amitabh bachchan cuts his birthday cake with producer anand pandit | वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत

वाढदिवशी बिग बींनी मोडली वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा; 'ही' व्यक्ती ठरली त्यासाठी कारणीभूत

Next
ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी काल त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा केला.

बॉलिवूडचे महानायक अशी ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी काल त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा केला (Amitabh Bachchan 79th Birthday). बिग बींचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी कोणत्याही उत्सावापेक्षा कमी नाही. त्यामुळे दरवर्षी बिग बींच्या वाढदिवशी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. अगदी त्यांच्या घराबाहेर रांग लावण्यापासून ते सोशल मीडियावर सर्वत्र 'बच्चन'मय वातावरण निर्माण होत असल्याचं दिसून येतं. परंतु, बिग बी कायमच त्यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने, सामान्यांच्या गर्दीपासून दूर फक्त आपल्या कुटुंबासोबतच वाढदिवस साजरा करतात. मात्र, यंदा बिग बींची ही परंपरा त्यांना मोडावी लागली आहे.

अमिताभ बच्चन त्यांच्या वाढदिवसी कधीच केक कापत नाहीत. तसंच ते थाटामाटातही या दिवसाचं सेलिब्रेशन करत नाहीत. मात्र, यावेळी  प्रसिद्ध निर्माते आनंद पंडित यांनी या सगळ्या परंपरा तोड बिग बींच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. 

'चेहरे' चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी बिग बींसाठी केक आणला आणि वाढदिवस साजरा केला. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर बिग बी कधीही त्यांच्या वाढदिवसी केक कापत नाही. त्याऐवजी ते देवासमोर दिवा लावतात. परंतु, यावेळी आनंद पंडितांनी त्यांची ही परंपरा मोडली.

"अमिताभ बच्चन यांना कोणतं गिफ्ट द्यावं हा खरंच फार मोठा प्रश्न आहे. परंतु, चेहरेला मिळालेल्या यशाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो.  त्यामुळेच त्यांना अजून आनंद होईल असं वेगळं काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न होता", असं आनंद पंडित म्हणाले. विशेष म्हणजे आनंद यांनी आणलेला केक कापण्यास बिग बी तयार झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं.

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव माहितीये का? अनेक वर्षांपूर्वीच केलाय नावात बदल

पुढे ते म्हणतात, "बिग बी कायमच देवापुढे दिवा लावून वाढदिवस साजरा करतात. परंतु, त्यांनी पहिल्यांदाच केक कापून टीमसोबत वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वागण्यावरुन एक समजलं की ते कोणालाच निराश करत नाहीत. ते चेहरेच्या संपूर्ण टीमला आपलं मानतात."

४० वर्षानंतर बिग बींना करायचं होतं रेखासोबत काम; 'या' कारणामुळे अपूर्ण राहिली इच्छा

दरम्यान, बिग बींची मुख्य भूमिका असलेल्या चेहरे या चित्रपटाचं दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केलं आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी, रिया चक्रवर्ती, अन्नू कपूर आणि क्रिस्टल डिसूझा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत.
 

Web Title: amitabh bachchan cuts his birthday cake with producer anand pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app