The allegation was made by Kamal, Rekha, forcibly taken by Kamal Haasan | कमल हासन यांनी घेतला होता जबरदस्तीने किस, रेखा यांनी केला होता असा आरोप

कमल हासन यांनी घेतला होता जबरदस्तीने किस, रेखा यांनी केला होता असा आरोप

ठळक मुद्देरेखा यांनी कमल हासन यांच्यासोबत Punnagai Mannan या चित्रपटात काम केल होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेखा यांना न सांगता कमल हासन यांनी त्यांचा किस घेतला होता.

कमल हासन यांनी घेतला होता जबरदस्तीने किस... रेखा यांनी केला होता आरोप हे वाचून ही गोष्ट कधी घडली होती हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... ही घटना एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी घडली होती. दाक्षिणात्य अभिनेत्री रेखा यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रेखा या घटनेविषयी बोलताना दिसत आहेत.

रेखा यांनी कमल हासन यांच्यासोबत Punnagai Mannan या चित्रपटात काम केल होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेखा यांना न सांगता कमल हासन यांनी त्यांचा किस घेतला होता. चित्रपटात असे काही दृश्य असणार याची रेखा यांना काहीच कल्पना नव्हती. या व्हिडिओद्वारे रेखा सांगत आहेत की, मला न सांगता किसिंग दृश्य चित्रीत करण्यात आले होते. सुरेश कृष्णा आणि वसंत या चित्रपटाचे असोसिएट डायरेक्टर होते. मी त्यांना सांगितले होते की, या दृश्याबद्दल मला काहीच माहीत नाहीये. त्यांनी मला सांगितले की, एखादा राजा एका लहान मुलाला किस करत आहे असा केवळ विचार कर... 

रेखा पुढे सांगतात, कमल हासन आणि या चित्रपटाच्या टीमला या दृश्याबद्दल पूर्णपणे कल्पना होती. हा चित्रपट त्या काळात सुपरहिट झाला होता. या चित्रपटामुळे मला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण मी एक नक्कीच सांगेन, या चित्रपटात किसिंग दृश्य द्यायला मी कधीच होकार दिला नव्हता. त्यांनी मला काही कळायच्याआधीच या दृश्याचे चित्रीकरण केले. मी त्यानंतर हे दृश्य पाहाण्याची हिंमत केली नाही. 

रेखा या केवळ त्यावेळी 16 वर्षांच्या होत्या. त्या सांगतात, या चित्रपटात हे दृश्य अश्लील वाटले नाही. कारण या चित्रपटाच्या कथानकाची ती गरज होती. 

Punnagai Mannan या चित्रपटाला आता 30 वर्षांपासून अधिक कालावधी झाला आहे. पण या दृश्यासाठी कमल हासन यांनी आता तरी माफी मागावी अशी मागणी लोक सोशल मीडियाद्वारे करत आहेत. 

Web Title: The allegation was made by Kamal, Rekha, forcibly taken by Kamal Haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.