ठळक मुद्दे प्रियंका चोप्रा या यादीत दहाव्या स्थानी आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि दीपिका पादुकोण यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट यंदाची सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला ठरली आहे. तर बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिने या संपूर्ण दशकातील सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला बनण्याचा मान पटकावला आहे.

लंडनच्या ‘ईस्टर्न आय’ या मॅगझिनने केलेल्या सर्वेक्षणानंतर सर्वाधिक सेक्सी आशियाई महिलांची यादी जाहिर करण्यात आली. या यादीत आलिया अव्वल स्थानी आहे. ऑनलाईन वोटिंग, मीडिया कव्हरेज आणि सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया या आधारावर हे सर्वेक्षण केले गेले. सर्वाधिक सेक्सी आशियाई महिलेचा किताब जिंकल्यानंतर आलियाने आनंद व्यक्त केला. सौंदर्य हे बाहेर दिसते ते नसून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, यावरून तुमचे सौंदर्य ठरते. मनाने सुंदर असाल तर तुम्ही कायम सुंदर राहता, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

2019 च्या सर्वाधिक सेक्सी आशियाई महिलांच्या यादीत आलिया शीर्षस्थानी आहे. गतवर्षी या यादीत दीपिका शीर्षस्थानी होती. यंदा मात्र आलियाने दीपिकाला पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे दीपिका दुस-या स्थानी आली. अर्थात तिचा या दशकातील सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला हा मान मात्र यंदाही कायम राहिला.

लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असलेली टेलिव्हिजन स्टार हिना खान हिने या यादीत तिसरे स्थान पटकावले.

तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने चौथा क्रमांक पटकावला. पाकिस्तानातील सर्वाधिक सेक्सी महिला हे तिचे स्थान यंदाही सलग पाचव्या वर्षी अबाधित आहे, हे विशेष.

सुरभी चंदना या अभिनेत्रीने कतरीना कैफ, प्रियंका चोप्रा अशा बड्या अभिनेत्रींना मागे टाकत या यादीत पाचवा क्रमांक पटकावला.

कतरीना कैफ या यादीत सहाव्या स्थानावर आली. तिच्या पाठोपाठ शिवांगी जोशी, निया शर्मा, मेहविश हयात यांचा क्रमांक आहे. प्रियंका चोप्रा या यादीत दहाव्या स्थानी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: alia bhatt is sexiest asian female of 2019 deepika padukone sexiest of decade in uk poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.