आलिया भटला हवीत ‘इतकी’ मुलं, गोंदवणार हा खास टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:48 PM2019-08-05T15:48:50+5:302019-08-05T15:49:40+5:30

नुकताच आलियाने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओ आलिया आणि तिची बेस्ट फ्रेन्ड आकांक्षा अनेक विषयांवर बोलताना दिसत आहेत.

alia bhatt reveals her tattoo has a ranbir kapoor connection | आलिया भटला हवीत ‘इतकी’ मुलं, गोंदवणार हा खास टॅटू

आलिया भटला हवीत ‘इतकी’ मुलं, गोंदवणार हा खास टॅटू

googlenewsNext
ठळक मुद्देआलियाने ‘सडक २’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. वर्षाअखेरीस ती ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात झळकणार आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूर  कामापेक्षा त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवस दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण शेवटी ते जगजाहिर झालेच. तूर्तास आलिया व रणबीर दोघेही एकमेकांसोबत आनंदी आहेत. होय, आलियाने तर रणबीरसाठी खास टॅटू बनवण्याचा निर्णयही घेतला आहे.
नुकताच आलियाने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओ आलिया आणि तिची बेस्ट फ्रेन्ड आकांक्षा अनेक विषयांवर बोलताना दिसत आहेत. अगदी टॅटूबद्दल आणि मुलांबद्दलही. होय, मी भविष्यात कधी टॅटू बनवलाच तर माझ्या शरीरावर ‘8’ चा टॅटू बनवेल, असे आलियाने या व्हिडीओ सांगितले आहे.

आता ‘8’चे रणबीर कपूरशी असलेले कनेक्शन तर तुम्हाला ठाऊक आहेच. होय, रणबीर जेव्हा केव्हा फुटबॉल खेळतो, तेव्हा ‘8’ नंबरची जर्सी घालतो. हेच कारण आहे की, आलिया आपल्या शरीरावर ‘8’ नंबरचा टॅटू गोंदवणार.


टॅटूशिवाय आलियाने मुलांबद्दलही खुलासा केला. लग्नानंतर किती मुले हवीत, या प्रश्नाचे उत्तर तिने दिले. मला दोन मुलं हवीत, असेही आलिया यात म्हणतेय.
आलियाने ‘सडक २’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. वर्षाअखेरीस ती ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.  अयान मुखर्जी हा चित्रपट दिग्दर्शित करतोय. पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणे अपेक्षित आहे.
  

Web Title: alia bhatt reveals her tattoo has a ranbir kapoor connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.