डिट्टो आलिया...! ‘आलियाचा डुप्लिकेट’ म्हणून चर्चेत आला हा तरूण, सोशल मीडियावर मीम्सचा पूर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:05 PM2019-11-25T12:05:48+5:302019-11-25T12:06:18+5:30

अभिनेत्री मधुबाला, अनुष्का शर्मा, काजोल, कतरीना कैफ अशा अनेक हिरोईनचे डुप्लिकेट समोर आलेत. आज आम्ही आलिया भटच्या डुप्लिकेटबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  

alia bhatt look alike bhuvam bam photo viral | डिट्टो आलिया...! ‘आलियाचा डुप्लिकेट’ म्हणून चर्चेत आला हा तरूण, सोशल मीडियावर मीम्सचा पूर!!

डिट्टो आलिया...! ‘आलियाचा डुप्लिकेट’ म्हणून चर्चेत आला हा तरूण, सोशल मीडियावर मीम्सचा पूर!!

googlenewsNext
ठळक मुद्देआलिया सध्या रणबीर कपूरला डेट करतेय. दोघेही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

बॉलिवूड स्टार्सचे डुप्लिकेट ही काही नवी गोष्ट नाही. आत्तापर्यंत अनेकांचे डुप्लिकेट तुम्ही पाहिले असतील. अगदी अलीकडे अभिनेत्री मधुबाला, अनुष्का शर्मा, काजोल, कतरीना कैफ अशा अनेक हिरोईनचे डुप्लिकेट समोर आलेत. आज आम्ही आलिया भटच्या डुप्लिकेटबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.  पण आलियाची डुप्लिकेट कुणी तरूणी नसून एक तरूण आहे.



 

होय, या तरूणाचे नाव आहे भुवन बाम. भुवन आणि आलिया भट या दोघांच्या चेह-यात बरेच साम्य असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सध्या याचमुळे भुवन व आलियावरचे अनेक जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर भुवनने आलियाला कॉफी डेटसाठी विचारणा केली आहे.
भुवन बाम हा युट्यूबर आहे. हाच भुवन आलियासारखा दिसतो, असे त्याच्या चाहत्यांचे मत आहे. फरक इतकाच की, भुवनला दाढी आहे. आलिया व भुवनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आलिया व भुवनचे  चीकबोन्स हसताना अगदी एकसारखे दिसत आहे. या फोटोनंतर अनेक लोकांनी भुवनला आलियाचे डुप्लिकेट म्हटले आहे. अनेक नेटकºयांनी यावर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. ‘दाढी काढ, मग डिट्टो आलिया,’ असे एका युजरने लिहिले आहे. ‘खरच तू आलियासारखा दिसतो,’ असे एकाने लिहिले आहे. ‘बस रणबीर को संभाल लेना,’अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे.




तूर्तास भुवनने आलियाला डेटसाठी विचारले आहे. ‘मी माझ्या क्रशसारखा दिसू लागलो आहे. प्लीज कॉफी डेटवर जाऊयात,’ असे भुवनने लिहिले आहे.
तुम्हाला ठाऊक आहेच की, आलिया सध्या रणबीर कपूरला डेट करतेय. दोघेही ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.




 

Web Title: alia bhatt look alike bhuvam bam photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.