ठरले! या ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:45 PM2019-12-10T12:45:00+5:302019-12-10T12:46:40+5:30

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. आता पुन्हा एकदा या लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा सुरु झालीय.

alia bhatt and ranbir kapoor marry in kashmir next year | ठरले! या ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा!

ठरले! या ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा!

googlenewsNext
ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणने या लग्नाबद्दलची हिंट दिली होती.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या लग्नाची  खोटी पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता पुन्हा एकदा या लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा सुरु झालीय. होय, मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या वर्षांत म्हणजे 2020 मध्ये आलिया व रणबीर लग्न करणार आहेत. विशेष म्हणजे, या लग्नाचे स्थळही ठरलेय.
ताज्या वृत्तानुसार, आलिया व रणबीर डेस्टिनेशन वेडिंग प्लान करत आहेत आणि यासाठी त्यांनी विदेशाची नव्हे तर भारताचे नंदनवन अर्थात काश्मीरची निवड केली आहे. दोघेही कामातून महिनाभराची सुट्टी घेऊन लग्न करणार असून या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.


सध्या आलिया-रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी आहेत. काही तांत्रिक कारणाने या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडतेय. आधी 2020 च्या उन्हाळ्यात हा सिनेमा रिलीज होणार होता. पण आता तो हिवाळ्यात रिलीज होणार असल्याचे कळतेय. याचदरम्यान आलिया-रणबीर लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत.


‘ब्रह्मास्त्र’ याच चित्रपटाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया, मौनी राय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.


 काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणने या लग्नाबद्दलची हिंट दिली होती. यानंतर एका ज्योतिष्याने रणबीर व आलियाच्या लग्नावर भाकित वर्तवले होते. आचार्य विनोद कुमार नामक ज्योतिष्याने वर्तवलेल्या भाकितानुसार, रणबीर व आलियाच्या कुंडलीनुसार 2019 च्या आॅक्टोबर ते 2020 पर्यंत दोघांच्या लग्नाचा मोठा योग आहे. प्रेमाचा ग्रह मानला जाणारा शुक्र दोघांच्याही कुंडलीत उच्चस्थानी आहे. तथापि आलियाच्या कुंडलीतील ग्रहदशा बघितली तर या नात्यात काही गैरसमज व गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. ज्यामुळे हे लग्न लांबणीवर पडू शकते.
 

Web Title: alia bhatt and ranbir kapoor marry in kashmir next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.