Ali Fazal wishes Gal Gadot for wonder woman 1984 release date she replied with miss you | अली फजलने 'वंडर वुमन १९८४'च्या रिलीजच्या दिल्या शुभेच्छा, Gal Gadot म्हणाली - मिस यू!

अली फजलने 'वंडर वुमन १९८४'च्या रिलीजच्या दिल्या शुभेच्छा, Gal Gadot म्हणाली - मिस यू!

कोरोना संक्रमणामुळे अजूनही मोठ्या बॅनरचे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज करणं टाळलं जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने थिएटरमध्ये 'सूरज पे मंगल भारी' सिनेमा रिलीज झाला. आता Gal Gadot चा 'वंडर वुमन' मोठ्या स्क्रीनवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने यावर्षी 'वंडर वुमन १९८४' हा सिनेमा रिलीज होणार आहे. याची घोषणा स्वत: Gal Gadot ने दिली आहे. याबाबत अली फजलने तिला शुभेच्छा दिल्या. ज्यावर Gal Gadot ने रिप्लाय सुद्धा दिला.

अली फजल आणि Gal Gadot ने एक वर्षाआधी लंडनमध्ये 'डेथ ऑन नाइल' सिनेमाची एकत्र शूटींग केली होती. आता त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचं दिसतं. Gal Gadot ने वंडर वुमन १९८४ ची घोषणा केली आणि अली ट्विटवर लिहिले की, 'बेस्ट ऑफ लक Gal. हे फार शानदार होणार आहे. अनेकजण या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत'. यावर Gal Gadot ने रिप्लाय दिला की, थॅंक यू. मिस यू!'. (कॉल सेंटरमध्ये नोकरी करत हात 'मिर्झापूर'चा गुड्डू पंडीत, सांगितला पहिला पगार....)

याआधी Gal Gadot ने ट्विटरवर घोषणा केली होती की, वंडर वुमन १९८४ अमेरिकेतील थिएटरमध्ये आणि HBO मॅक्सवर २५ डिसेंबर २०२० ला रिलीज होईल. कोरोनामुळे या सिनेमाचं रिलीज आधीच टाळण्यात आलं होतं. पण आता खास बाब ही आहे की, रिलीज झाल्यावर एक महिन्यापर्यंत तुम्ही सिनेमा एचबीओ मॅक्सवर फ्रीमध्ये बघू शकता. त्यानंतर यावर चार्ज लावण्यात येईल.

Gal Gadot ने ट्विटरवर आता शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'वेळ आली आहे. आम्ही सर्वांनी या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली आहे. मी तुम्हाला सांगू शकत नाही की, मी या सिनेमासाठी किती उत्सुक आहे. मी कधीही विचार नव्हता केला की, या सिनेमाच्या रिलीजसाठी आम्हाला इतकी वाट बघावी लागेल. मात्र, कोविडने जगाला हलवून ठेवलं आहे. तुम्ही आता हा सिनेमा थिएटरमध्ये बघू शकता. HBO मॅक्सवरही तुम्ही सिनेमा बघू शकता. काळजी घ्या आणि मास्क लावा. माझ्याकडून तुम्हा सर्वाना हॅपी हॉलिडे'.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ali Fazal wishes Gal Gadot for wonder woman 1984 release date she replied with miss you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.