या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्यामुळे अक्षय खन्नाने केले नाही लग्न, ही अभिनेत्री आज आहे घटस्फोटीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T15:00:27+5:30

अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं होतं.

Akshaye Khanna was all set to marry Karisma Kapoor and then THIS happened PSC | या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्यामुळे अक्षय खन्नाने केले नाही लग्न, ही अभिनेत्री आज आहे घटस्फोटीत

या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्यामुळे अक्षय खन्नाने केले नाही लग्न, ही अभिनेत्री आज आहे घटस्फोटीत

Next
ठळक मुद्दे'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं. ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं.

अक्षय खन्नाचा आज म्हणजेच 28 मार्चला वाढदिवस असून अभिनेते विनोद खन्ना यांच्या या मुलाने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्याने हिमालय पुत्र या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर बॉर्डर या चित्रपटात तो झळकला. बॉर्डर या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर अक्षयने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्याने या चित्रपटाप्रमाणेच ‘दिल चाहता है’, ‘डोली सजा के रखना’, ‘ताल’, ‘गांधी माय फादर’, ‘हमराज़’, ‘दिवानगी’, ‘गली-गली चोर है’, ‘आ अब लौट चलें’ आणि ‘हलचल यांसारख्या अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

अक्षय खन्नाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी त्याने अद्याप लग्न केलेले नाहीये किंवा त्याचे प्रेमप्रकरण देखील ऐकायला मिळालेले नाहीये. त्यामुळे अक्षय कधी लग्न करणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. अक्षय खन्नाच्या खाजगी आयुष्याविषयी आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. 'ताल' चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडलं. ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होतं. त्याने ही बाब त्यावेळी वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती. ते करिश्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिश्माच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. करिश्माचे वडील रणधीर यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांची पत्नी बबिता यांना हे मान्य नव्हतं.

करिश्मा त्याकाळात एकाहून एक हिट चित्रपट देत होती. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जात असे. यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करू नये अशी तिची आई बबिता यांची इच्छा होती आणि त्याचमुळे हे लग्न होऊ शकले नाही असे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते अक्षय ऐवजी करिश्माचे अभिषेक बच्चनसोबत लग्न व्हावे असे बबिता यांना वाटत असल्याने त्यांनी या नात्यासाठी नकार दिला होता. करिश्माचे त्यानंतर अभिषेकसोबत साखरपुडा झाला आणि तो काहीच महिन्यात मोडला. साखरपुडा मोडल्यानंतर करिश्माने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshaye Khanna was all set to marry Karisma Kapoor and then THIS happened PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app