Akshay Kumar's son Aarav appears with 'Mystery Girl', photo goes viral on social media | 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा आरव, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा आरव, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा मुलगा आरव जास्त लाइमलाइटमध्ये नसतो. मात्र सध्या तो खूप चर्चेत आला आहे. कारण आरवचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला आहे. या फोटोत त्याच्यासोबत एक मैत्रीणही दिसते आहे. या फोटोतील ही मुलगी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

आरवचा जो फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे त्यात त्याने एका मैत्रिणीला खांद्यावर उचलून घेतले आहे. या फोटोत आरव आणि त्याची मैत्रीण दोघांनीही खास पोज दिली आहे. सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.


आरव फारसा लाइमलाइटमध्ये नसला तरी तो बॉलिवूडमध्ये पदार्पण कधी करणार हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. आरवच्या बॉलिवूड पदार्पणावर बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, 'तो अजून खूप लहान आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचे त्याचे वय आहे. त्याला बॉलिवूडमध्ये काम करायचे की, नाही हे मला माहित नाही. परंतु मी त्याला कोणतीही जबरदस्ती करणार नाही.'


अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याचा सूर्यवंशी हा आगामी सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

या व्यतिरिक्त तो लक्ष्मी बॉम्ब, पृथ्वीराज, बेल बॉटम आणि अतरंगी रे या सिनेमात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay Kumar's son Aarav appears with 'Mystery Girl', photo goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.