सेलिब्रेटींच्या आयुष्याशी निगडीत सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता असते. आणि त्यात खिलाडी अक्षय कुमारच्या संदर्भात असेल तर त्याची बातच न्यारी. त्याचा असाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे. नेहमीच अक्षयची प्रत्येक झलक कॅप्चर करण्यासाठी मीडिया त्याला घेरत असते. यावेळीही अक्षय दिसताच मीडियाने त्याला कॅमे-यात कॅप्चर करण्यास सुरूवात केली. मात्र अक्षय कुमारनं फोटोग्राफर्सना पाहून असं काही केलं की त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल.

अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे अक्षय सुरुवातीला हळूहळू चालताना दिसतोय. अचानक त्यानं असं भासवलं की तो आता धावणार आहे. त्याचा हा कॉमेडी अंदाज बघून कॅमेरामनही काही वेळासाठी भांबावले. कॅमेरामनची झालेली ही अवस्था पाहून अक्षयलाही हसून आवरणे कठिण झाले आणि तोही मोठमोठ्यानं हसू लागला. त्याचा हा प्रॅन्क व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.


त्याच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचे झाले तर ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा आता 22 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा 2020 मध्ये नाताळच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. पण असे झाले असते तर आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’सोबत या सिनेमाचा बॉक्स ऑफिस संघर्ष अटळ होता. त्यामुळे आमिरने अक्षयला ‘बच्चन पांडे’ची रिलीज डेट बदलण्याची विनंती केली होती. आमिरच्या शब्दाखातर अक्षयने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलली. विशेष म्हणजे, यामुळे अक्षयला त्याच्याच आणखी एका चित्रपटाची रिलीज डेटही बदलावी लागली. होय, आता त्याचा ‘बेल बॉटम’ हा सिनेमाही 22 जानेवारीला नाही तर 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल.


सिनेमातील त्याचा ‘किलर’ अवतार पाहून सगळेच चकीत झालेत. वाढलेली दाढी, जबरदस्त बॉडी, गळ्यातील सोनसाखळ्या आणि भयावह डोळे असा त्याचा अवतार आहे. या लूकमध्ये अक्षय कुमार अंत्यंत हटके अंदाजात दिसत आहे. त्याचा हा हटके लूक व्हायरल झाला आणि चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title:  Akshay Kumar's Prank Video Goes viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.