akshay kumar like on the tweet of jamia milia students it was by mistake | अक्षय कुमारला एक ‘लाईक’ पडले महाग; आली खुलासा करण्याची वेळ
अक्षय कुमारला एक ‘लाईक’ पडले महाग; आली खुलासा करण्याची वेळ

ठळक मुद्देअक्षयच्या खुलाशानंतर काही लोकांनी त्याला पाठींबा दिला तर काहींनी याऊपरही त्याला ट्रोल केले.

नव्या नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाची आग आता देशभर पसरली आहे.  या कायद्याविरोधात दिल्लीतील प्रतिष्ठीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थीही रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अशाच एका व्हिडीओला लाईक करणे अक्षय कुमारला महाग पडले. होय, अक्षयच्या लाईकचे प्रकरण इतके वाढले की, त्याला यावर खुलासा करावा लागला.
सोशल मीडियावर जामिया विद्यापीठ आंदोलनाचे अनेक व्हिडीओ व पोस्ट व्हायरल होत आहे. काही व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली तोडफोड दाखवली आहे तर काहींमध्ये पोलिसांची अमानुष मारहाण. अशाच एका व्हिडीओला अक्षयने लाईक केले. या व्हिडीओत आंदोलकांची पळापळ दिसतेय. झाले असे की, अक्षयने हा व्हिडीओ चुकून लाईक केला आणि त्याने लाईक केलेली पोस्ट क्षणात व्हायरल झाली.

साहजिकच यानंतर अक्षयला ट्रोल करणे सुरु झाले. मग काय, अक्षयला त्याची चूक लक्षात आली. त्याने लगेच यावर खुलासा केला. ‘ट्वीट स्क्रॉल करताना चुकून ही पोस्ट लाईक झाली. मी अशा कुठल्याही कृत्याचे समर्थन करत नाही. मी लगेच ही पोस्ट अनलाईक केली होती,’ असे खुलासा करताना त्याने लिहिले.




अक्षयच्या या खुलाशानंतर काही लोकांनी त्याला पाठींबा दिला तर काहींनी याऊपरही त्याला ट्रोल केले. तुला खुलासा करण्याची गरज नाही सर, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, असे एका युजरने लिहिले. याऊलट, ‘देशात आग लावणे हेच विदेशींचे काम असते,’ अशा शब्दांत एका युजरने अक्षयला ट्रोल केले. यानंतर सोशल मीडियावर #BoycottCanadianKumar व #ISupportAkshay  असे   हॅशटॅग ट्रेंड करू लागले.

Read in English

Web Title: akshay kumar like on the tweet of jamia milia students it was by mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.