Akshay kumar sooryavanshi not releasing in theatre corona | थिएटर उघडल्यावर सुद्धा रिलीज होणार नाही अक्षय कुमारचा सूर्यवंशी, समोर आले हे कारण

थिएटर उघडल्यावर सुद्धा रिलीज होणार नाही अक्षय कुमारचा सूर्यवंशी, समोर आले हे कारण

कोरोना व्हारसच्या महामारीमुळे दीर्घकाळापासून सिनेमागृह बंद होते. मात्र आता अनलॉकच्या प्रक्रियेनुसार 15 ऑक्टोबरला थिएटर सगळ्यांनासाठी उघडणार आहेत. अशी आशा आहे की आता प्रत्येक बिग बजेट चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. या लिस्टमध्ये अक्षय कुमारचासूर्यवंशीचं नाव सगळ्यात वर आहे. मात्र फॅन्ससाठी एका वाईट बातमी आहे. 


थिएटरमध्ये रिलीज होणार सूर्यवंशी?
आजतकच्या रिपोर्टनुसार थिएटर ओपन झाल्यावरदेखील अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार नाही आहे. ज्याला यादिवाळीत रिलीज करण्याचा विचार करण्यात येत होता. पण आता असं होणार नाही आहे.  निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार थिएटर नक्कीच उघडली जात आहेत, परंतु सर्व राज्यातील थिएटर उघणार नाही आहेत. त्यांच्या मते, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यासारखी राज्ये अजूनही थिएटर उघडण्यास नकार देत आहेत.अशा परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा काही उपयोग होत नाही. अशी माहिती आहे की मेकर्स सूर्यवंशी डिसेंबरमध्ये रिलीज करु शकतात, मात्र अजून हे फायनल झालेले नाही. कोरोनाच्या परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. 

ओटीटीवर रिलीज होणार लक्ष्मी बॉम्ब 
या दिवाळीत अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब रिलीज होणार आहे. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.अक्षय कुमार या सिनेमातून पहिल्यांदाच एका किन्नरची भूमिका साकारणार आहे. अशात त्याचा हा एक्सपरिमेंट प्रेक्षकांना किती भावतो, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि तुषार कपूरही दिसणार आहे. कोरोना काळात सोशल मीडियातून या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay kumar sooryavanshi not releasing in theatre corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.