akshay kumar movie sooryavanshi producer shibasish sarkar corona positive-ram | ‘83’ आणि ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निर्मात्याही कोरोनाची लागण, रूग्णालयात भरती

‘83’ आणि ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निर्मात्याही कोरोनाची लागण, रूग्णालयात भरती

कनिका कपूर, मोरानी कुटुंब, किरण कुमार, मोहिना सिंग यांच्यानंतर बॉलिवूडच्या आणखी एका सेलिब्रिटीला कोरोनाची लागण झाली आहे. होय, ‘83’ आणि ‘सूर्यवंशी’ या आगामी सिनेमाचे निर्माते आणि रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रूपचे सीईओ शिबाशीष सरकार यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून शिबाशीष यांना ताप होता. त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटीव्ह आली. यानंतर लगेच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काही दिवसांपूर्वीच शिबाशीष यांनी ‘83’ व ‘सूर्यवंशी’ हे दोन्ही सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार नसल्याचे स्पष्ट केल होते. लॉकडाऊन उघडल्यानंतर आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच हे दोन सिनेमे रिलीज होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

  मुंबईत कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहेत. आता कोरोना सेलिब्रिटींच्या घरापर्यंतही पोहोचला आहे. अलीकडे बोनी कपूर आणि करण जोहर यांच्या घरातील स्टाफ कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्यापूर्वी सिंगर कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली होती. पाठोपाठ निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कोरोनाने ग्रासले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेते किरण कुमार हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. अर्थात आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: akshay kumar movie sooryavanshi producer shibasish sarkar corona positive-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.