अखेर बदलले अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव, आता या टायटलने रिलीज होणार सिनेमा

By रूपाली मुधोळकर | Published: October 29, 2020 06:23 PM2020-10-29T18:23:31+5:302020-10-29T18:25:18+5:30

लक्ष्मी बॉम्ब’ या टायटलवरूनही प्रचंड राडा झाला. इतका की अखेर मेकर्सला ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलावे लागले.

akshay kumar film laxmmi bomb renamed to laxmmi | अखेर बदलले अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव, आता या टायटलने रिलीज होणार सिनेमा

अखेर बदलले अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे नाव, आता या टायटलने रिलीज होणार सिनेमा

googlenewsNext
ठळक मुद्दे'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल.

अक्षय कुमारचालक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि वादाला तोंड फुटले. या सिनेमात अक्षय कुमारने आसिफ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. यावरून अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला. यानंतर सिनेमाच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या टायटलवरूनही प्रचंड राडा झाला. इतका की अखेर मेकर्सला ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलावे लागले.

आता या नावाने होणार प्रदर्शित

‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमाच्या नावावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु होता. सोशल मीडियावर या नावावरून मोठे रान उठले होते. अगदी या सिनेमावर बहिष्कार घालण्याची मागणी केली गेली होती. काही हिंदू संघटनांनीही या नावाला विरोध केला होता. हा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे दिसताच अखेर मेकर्सनी सिनेमाचे टायटल बदलण्याचा निर्णय घेतला. आता हा सिनेमा ‘लक्ष्मी’ या नव्या नावाने प्रदर्शित होईल.

म्हणून ठेवले होते ‘लक्ष्मी बॉम्ब’  हे नाव
‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावावर स्पष्टीकरण देताना सिनेमाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी हे नाव ठेवण्यामागचे कारण सांगितले होते.  त्यांनी सांगितले होते की, आमच्या तमिळ सिनेमाचे मुख्य कॅरेक्टर कंचना होते. कंचनाचा अर्थ सोनं होतो जे स्वत: लक्ष्मीचे एक रूप मानले जाते. आधी आम्ही हिंदीतही ‘कंचना’ हेच टायटल ठेवणार होतो. पण नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून हे नाव बदललं जेणेकरून हिंदी आॅडिअन्सना अपील करू शकू. मग ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव फायनल झाले. देवाच्या कृपेने हे कॅरेक्टर सिनेमात धमाक्यासारखा येते. त्यामुळे आम्ही हिंदी सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवल्से. ज्याप्रमाणे लक्ष्मीचा धमाका कधी मिस होत नाही त्याचप्रमाणे या सिनेमातील मुख्य भूमिकाही एक ट्रान्सजेंडर आहे आणि तो शक्तिशाली आहे. त्यामुळे हे टायटल आमच्या सिनेमासाठी पूर्णपणे योग्य आहे.’ 

हे दोन बदल ठरले वादाचे कारण
काही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठले होते. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप झाला होता. लक्ष्मी बॉम्ब या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाना होता.  या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ  आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. 
‘लक्ष्मी बॉम्ब’ हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे. हा हॉरर-कॉमेडी सिनेमा 9 नोव्हेंबर 2020 ला डिज्ने प्लस हॉटस्टारवर ऑनलाइन रिलीज होणार आहे. 

Web Title: akshay kumar film laxmmi bomb renamed to laxmmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.