shaktimaan actor mukesh khanna is against akshay kumar film laxmi bomb for title | - तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना

ठळक मुद्देप्रत्येक निर्माता आपला सिनेमा हिट करू इच्छितो, त्यासाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केले जातात. लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमाही त्यापैकीच एक आहे. डिफ्युज करा याला...’, असे मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि तेव्हापासून एक ना अनेक कारणांनी हा सिनेमा वादात सापडला. या सिनेमात अक्षय कुमारने आसिफ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. यावरून अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला. यानंतर सिनेमाच्या टायटलवरूनही राडा झाला. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनीही अक्षयच्या या सिनेमावर आक्षेप घेत, चित्रपटाच्या टायटलची निंदा केली आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुकेश खन्ना यांनी अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चे पोस्ट शेअर केले. पण हे पोस्टर शेअर करताना त्यांनी चित्रपटाच्या नावाला विरोध केला.

काय म्हणाले मुकेश खन्ना?
 ‘लक्ष्मी बॉम्ब या नावाने कोणताही सिनेमा रिलीज व्हायला हवा? यावर देशभर वादविवाद सुरु आहे. काही लोक हा सिनेमा बॅन करण्याची मागणी करत आहेत. मला विचाराल तर बॅन योग्य नाही. कारण अद्याप कोणीच सिनेमा पाहिलेला नाही. केवळ ट्रेलर पाहिला आहे. मात्र फक्त टायटलची गोष्ट केलीच तर लक्ष्मीच्या पुढे बॉम्ब जोडणे खोडसाळपणा आहे. कमर्शिअल इंटरेस्ट हाच एक विचार यामागे असल्याचे वाटते. चित्रपटाच्या या नावाला परवानगी द्यायला हवी? तर कदापि नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीसस असे शीर्षक ठेऊ शकता? नाही ना, मग लक्ष्मी बॉम्ब टायटल कसे चालणार? असे वाद निर्माण व्हावे, त्यावरून चर्चा व्हावी यासाठीच असा धूर्तपणा केला जातो. हे असेच होते आणि होत राहील. मात्र कधीतरी हे थांबवावे लागेल आणि हे केवळ जनताच थांबवू शकते. या व्यावसायिक लोकांमध्ये जराही हिंदूंची भीती नाही. दुस-या धर्मासोबत असा पंगा घेऊन दाखवा, तलवारी निघतील. म्हणून अन्य धर्माशी हे लोक पंगा घेत नाही. हिंदू धर्म मात्र यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट आहे. प्रत्येक निर्माता आपला सिनेमा हिट करू इच्छितो, त्यासाठी जाणीवपूर्वक असे वाद निर्माण केले जातात. लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमाही त्यापैकीच एक आहे. डिफ्युज करा याला...’, असे मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

वाद सुरूच! अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' ला करणी सेनेकडून लीगल नोटीस, केली 'ही' मागणी...

IN PICS : ‘लक्ष्मी बॉम्ब’ एकटा नाही, प्रदर्शनाआधी या सिनेमांवरूनही खूप झाला राडा

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shaktimaan actor mukesh khanna is against akshay kumar film laxmi bomb for title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.