akshay kumar celebrates twinkle khanna grandmothers betty kapadia birthday | कोण आहे व्हायरल फोटोतील अक्षय कुमारसोबत दिसलेली ही महिला?  
कोण आहे व्हायरल फोटोतील अक्षय कुमारसोबत दिसलेली ही महिला?  

ठळक मुद्देअक्षय सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. ‘हाऊसफुल 4’नंतर ‘गुड न्यूज’ या चित्रपटात तो करिना कपूरसोबत दिसणार आहे.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आणि बघता बघता चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. पण तूर्तास आम्ही अक्षयच्या या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या एका व्हायरल फोटोबद्दल सांगणार आहोत. होय, अक्षयचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोत अक्षय एका वयोवृद्ध महिलेसोबत दिसतोय. ब्ल्यू कलरचा शर्ट घातलेली ही महिला व्हिलचेअरवर बसलेली दिसतेय आणि अक्षय तिच्या मागे उभा आहे. हा फोटो क्षणात व्हायरल झाला आणि ही महिला कोण असा प्रश्न अनेकांना पडला. तर आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे. ही महिला दुसरी कुणी नसून अक्षयची पत्नी ट्विंकलची आजी आहे. बेटी कपाडिया (Betty Kapadia ) त्यांचे नाव. 

 
नुकताच अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाच्या आजीचा ८० वा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षयने त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढला. अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई बाहेर शिलिम्ब येथे  आजीचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान तेथे अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या घरातील इतर कुटुंबीय उपस्थित होते.  ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यातल्याच एका फोटोत अक्षय आणि बेटी कपाडिया दिसत आहेत. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


अक्षय सध्या अनेक चित्रपटांत बिझी आहे. ‘हाऊसफुल 4’नंतर ‘गुड न्यूज’ या चित्रपटात तो करिना कपूरसोबत दिसणार आहे. यापाठोपाठ रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ व ‘पृथ्वीराज’ हे त्याचे सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
अक्षयच्या ‘हाऊसफुल 4’चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवसांत १०० कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे.  

Web Title: akshay kumar celebrates twinkle khanna grandmothers betty kapadia birthday

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.