Akshay kumar booked all seats mumbai delhi flight for sister safety from coronavirus gda | भावा जिंकलंस! खिलाडी कुमारने बहिणीला कोरोनापासून वाचवण्यासाठी बूक केली संपूर्ण फ्लॉईट

भावा जिंकलंस! खिलाडी कुमारने बहिणीला कोरोनापासून वाचवण्यासाठी बूक केली संपूर्ण फ्लॉईट

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लोक हैराण आहेत. देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटीही शूटिंग बंद असल्यामुळे घरातच आहेत. अभिनेता अक्षय कुमारने पीएम केअर फंडला 25 कोटींची मदत केलीय. बीएमसीला तीन कोटी तर CINTAA ला 45 लाखांची मदत केलीय. तर दुसरीकडे कुटुंबीयांच्या मदतीसाठी देखील अक्षय कुमार धावून आला आहे. चौथ्या फेजमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये देशाअंतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. अक्षयने बहिण अल्का भाटिया आणि तिच्या मुलांना मुंबईतून दिल्लीत पाठवण्यासाठी संपूर्ण फ्लाईट बुक केली.  

अक्षयने बहीण आणि मुलांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी त्याने असे केले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार मुंबईतून दिल्लीला जाणारी एकच फ्लाईट अशी होती ज्यात सगळ्यात कमी यात्रेकरु होते. ज्यात अल्का भाटिया आणि तिच्या मुलांची नावं आहेत. 

अक्षय कुमार पहिला असा सेलिब्रेटी आहे जो कोरोना व्हायरसमध्ये शूटिंगसाठी गेला होता. 20 लोकांच्या टीमसोबत अक्षयने एका जाहिरातीसाठी चित्रीकरण केले. लॉकडाऊननंतर लोकांच्या असलेल्या जबाबदाऱ्या या विषयावरील एका जाहिरातीचे चित्रीकरण केले. ही जाहिरात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागासाठी चित्रीत केली गेली असून चित्रीकरण करताना सगळ्यांनी मास्क घातले होते. तसेच कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्रकारे फैलाव होणार नाही याची काळजी चित्रीकरण करताना घेण्यात आली. या जाहिरातीचे दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay kumar booked all seats mumbai delhi flight for sister safety from coronavirus gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.