Akshay kumar announces releases date of bachchan pandey with interesting poster | अक्षय कुमारने शेअर केलं बच्चन पांडेचे पोस्टर जबरदस्त पोस्टर, थिएटरमध्ये 'या' दिवशी होणार रिलीज

अक्षय कुमारने शेअर केलं बच्चन पांडेचे पोस्टर जबरदस्त पोस्टर, थिएटरमध्ये 'या' दिवशी होणार रिलीज

अक्षय कुमारचा आगामी ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा चर्चेत आहे. आता त्याने या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. यासोबतच त्याने 'बच्चन पाडें'च्या रिलीज डेटची ही घोषणा केली आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 

26 जानेवारी 2022 ला होणार रिलीज
सिनेमाच्या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचा लूक बर्‍याच इंटरेस्टिंग दिसतो आहे. अक्षयने पोस्टरसह लिहिले आहे, त्याचा लूकच पुरेसा आहे. 'बच्चन पांडे' 26 जानेवारी 2022 ला रिलीज होणार आहे. 

या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची शूटिंग जैसलमेर सुरु आहे. अलीकडेच अक्षयने 'अतरंगी रे' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केलं. अक्षयसोबत या सिनेमात सारा अली खान आणि धनुष दिसणार आहे. तसेच बेल बॉटम', 'रक्षा बंधन', 'राम सेतु' सारख्या सिनेमातही अक्षय कुमार झळकणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay kumar announces releases date of bachchan pandey with interesting poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.