Akshay Kumar 6 Year old Daughter does not want to leave home due to Media Photographers | 'या' कारणामुळे अक्षय कुमारच्या मुलीला घराबाहेर पडण्यास वाटते भीती

'या' कारणामुळे अक्षय कुमारच्या मुलीला घराबाहेर पडण्यास वाटते भीती


प्रत्येक कलाकाराला स्टारडम हे हवं असतं त्यामुळे कलाकार वेगवेगळ्या आयडीयाच्या कल्पना वापरत पब्लिसिटी मिळवतानाही आपण पाहातो. तसेच सध्या स्टारकिड्सही आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लाईमलाईटमध्ये येतात. त्यांचे बाहेर फिरतानाचे फोटो ,  त्यांच्या आयुष्यात काय काय करतात या सगळ्या घडामोडी सोशल मीडियामुळे कळतात. मात्र हीच गोष्ट खिलाडी अक्षय कुमारला आवडत नाही. अक्षय जेव्हा त्याच्या कुटुंबासोबत असतो तेव्हा मीडियाचे कॅमेरे त्यांना टीपण्यासाठी तिथे आधीच हजर असतात. अक्षयला आता कुटुंबासह बाहेर फिरण्याचा आनंद घेणेही मुश्कील  वाटू लागले आहे.  


अशी पब्लिसिटी अक्षयला आता नकोशी  झाली आहे. अक्षयने सांगितले की,  आता तर माझी 6 वर्षाची मुलगीही आमच्या बरोबर बाहेर फिरायला येण्यास नकार देते. कारण जिथे आम्ही जातो तिथे मीडियाचे कॅमेरे असणार आणि  आणि तिला फ्लॅशलाइट अजिबात आवडत नाही. या भीतीने ती आमच्याबरोबर बाहेर येतच नाही. तसेच  मुलगा आरवलाही आमच्या बरोबर फिरायला येणे आवडत नाही. मुलांचेही बरोबर आहे, कारण त्याची इच्छा नसते की, लोकांनी त्यांना थकलेले पाहावे. असे फोटो सर्रास सोशल मीडियावर शेअरही केले जातात आणि मग उगाच मुलांना आमच्यामुळे नाहक ट्रोल केले जाते हा प्रकार कुठेतरी थांबावा असे वाटते. आपल्याकडे विनापरवानगी फोटो काढलास तर त्याला दंड बसावा असा नियम लागू करण्याची गरज भासु लागली आहे. जेणे करून या सगळ्या गोष्टींना कुठे तरी आळा बसेल.


तसेच काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना आणि तिचा मुलगा आरव यांना विमानतळावर पाहाण्यात आले होते. त्यावेळी ट्विंकल जीन्स आणि टी-शर्टमध्ये खूपच छान दिसत होती. तिने यावेळी स्टायलिश गॉगल देखील लावला होता. आरवने देखील स्टायलिश टी-शर्ट आणि गॉगल घातला होता. पण असे असून देखील त्याच्या स्टाईलवरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आणि चक्क त्याची तुलना सलमान खानचा 'तेरे नाम' हा  चित्रपटापटातील सलमानची हेअरस्टाईल सारखी दिसत असून आरव देखील काहीसा यासारख्याच हेअर स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या या फोटोवर कोणी त्याला तेरे नाम हेअर स्टाईल अशी कमेंट दिली तर काही नेटिझन्सनी त्याला तेरे नाम फॅन म्हटले. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Akshay Kumar 6 Year old Daughter does not want to leave home due to Media Photographers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.