OMG! इतका बदलला अक्षय खन्ना; चाहते झालेत अवाक, तुम्हालाही बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:52 PM2019-08-28T14:52:52+5:302019-08-28T14:53:56+5:30

‘हिमालय पुत्र’ या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अक्षय खन्ना अनेक दिवसानंतर मीडियाच्या समोर आला. पण हे काय? त्याला पाहून सगळेच अवाक झालेत.

akshay khanna spotted in mumbai fans are comparing his new look with hollywood actor jason statham | OMG! इतका बदलला अक्षय खन्ना; चाहते झालेत अवाक, तुम्हालाही बसेल धक्का!!

OMG! इतका बदलला अक्षय खन्ना; चाहते झालेत अवाक, तुम्हालाही बसेल धक्का!!

googlenewsNext
ठळक मुद्दे लवकरच अक्षयचा ‘सेक्शन 375’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘हिमालय पुत्र’ या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अभिनेता अक्षय खन्ना अनेक दिवसानंतर मीडियाच्या समोर आला. पण हे काय? त्याला पाहून सगळेच अवाक झालेत. त्याचा बदलेला लूक पाहून अनेकांनी  हॉलिवूड अभिनेता जॅसन स्टेथमसोबत त्याची तुलना करणे सुरु केले. काही तर त्याला पाहून ‘ऑस्कर...ऑस्कर...’ म्हणून ओरडू लागले.

अक्षय खन्ना बराच बदलेला दिसला. त्याच्या डोक्यावर अगदीच कमी केस दिसले. क्लिन शेव आणि डोक्यावर टक्कल पाहून लोकांनी त्याची तुलना जॅसन स्टेथमसोबत केली. (जॅसन स्टेथम या हॉलिवूडच्या सुपरस्टारने फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस अणि ट्रान्सपोर्टर सारखे शानदार सिनेमे दिले आहेत.)

अक्षयचे हे ताजे फोटो लगेच व्हायरल झालेत. या फोटोंवर लगेच युजर्सनी कमेंट्स देणे सुरु केले. काहींनी त्याच्या केसांबद्दल चिंता व्यक्त केली तर काहींनी त्याच्या दमदार अ‍ॅक्टिंगचे कौतुक केले. अनेकांनी ‘मिस यू’ असे लिहिले.

अक्षयचा ‘हिमालय पुत्र’ हा पहिलाच चित्रपट  फ्लॉप झाला. एका फ्लॉपनंतर अक्षय 'बॉर्डर' चित्रपटमध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. या चित्रपटात अक्षयसोबत सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते. पण, अक्षय खन्नाचे काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरले.

यानंतर ‘मोहब्बत’,‘कुदरत’,‘लावारिस’,‘हमराज’,‘हंगामा’,‘मॉम’ अशा अनेक चित्रपटात अक्षय झळकला. 1999 मध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटातील ऐश्वर्या व अक्षयची जोडी खूपच हिट झाली होती. लवकरच अक्षयचा ‘सेक्शन 375’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या 13 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

Web Title: akshay khanna spotted in mumbai fans are comparing his new look with hollywood actor jason statham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.