ajay devgn and ranbir kapoor upcoming film with director luv ranjan shut down | OMG! ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ रखडला ‘हा’ दुसरा चित्रपट!!
OMG! ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ रखडला ‘हा’ दुसरा चित्रपट!!

ठळक मुद्देलव रंजन यांचा चित्रपट सतत लांबणीवर पडत होता. चर्चेनुसार, काही रचनात्मक मतभेदांमुळे दिग्दर्शक व कलाकारांमध्ये एकमत होत नव्हते.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सलमान खान व आलिया भटला घेऊन ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट बनवणार होते. चित्रपटाची घोषणाही झाली होती. पण मध्येच भन्साळींनी हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला आणि ‘इंशाअल्लाह’ कायमचा थंडबस्त्यात गेला. आता ‘इंशाअल्लाह’ पाठोपाठ आणखी एक चित्रपट रखडण्याची चिन्हे आहेत. होय, दिग्दर्शक लव रंजन अभिनेता रणबीर कपूर, अजय देवगण आणि दीपिका पादुकोण यांना घेऊन एक चित्रपट बनवणार होते. पण आता या चित्रपट कायमचा बंद होण्याची शक्यता आहे.

दिग्दर्शक लव रंजन यांच्यावर मीटू अंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. याचमुळे दीपिका पादुकोणने लव रंजनच्या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवताच ती ट्रोल झाली होती. ताजी खबर मानाल तर, आता अजय देवगणनेही या चित्रपटातून अंग काढून घेतले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर  लव रंजनचा हा चित्रपट बनणे आता अशक्य वाटू लागले आहे. लवकरच लव रंजन हा चित्रपट सोडून अन्य एका दुस-या प्रोजेक्टवर काम सुरु करणार असल्याचीही चर्चा आहे.

लव रंजन यांचा चित्रपट सतत लांबणीवर पडत होता. चर्चेनुसार, काही रचनात्मक मतभेदांमुळे दिग्दर्शक व कलाकारांमध्ये एकमत होत नव्हते. अशात अजयने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्याच्या नकारानंतर तर  मतभेदांच्या बातमीवर जणू शिक्कामोर्तब झाले.
अजयने नुकताच नीरज पांडे यांचा सिनेमा साईन केला.  सोशल-पॉलिटिकल ड्रामा असलेल्या या चित्रपटात अजय चाणक्यची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय भुज- द प्राईड आॅफ इंडिया, तानाजी- द अनसंग वॉरियर असे चित्रपटही त्याच्याकडे आहेत. रणबीरचे म्हणाल तर अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र आणि करण मल्होत्राचा शमशेरा या दोन चित्रपटांत तो बिझी आहे.
 


Web Title: ajay devgn and ranbir kapoor upcoming film with director luv ranjan shut down
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.