ठळक मुद्देआई चिडली असली तरी अभिषेक त्याचे मतदान करण्याचे काम करत होता तर ऐश्वर्या अतिशय शांतपणे तिथेच उभी राहिली होती. त्यांचे अधिकाऱ्यासोबत बोलणे झाल्यावर त्यांना मतदान करण्यासाठी ती घेऊन गेली.

महाराष्ट्रात सोमवारी मतदान झाले. यावेळी सामान्य नागरिकांसोबत बॉलिवूड सेलिब्रेटींनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शाहरूख खान, आमिर खान, रणवीर सिंग, माधुरी दीक्षित असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मतदानाच्या रांगेत उभे दिसले. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनीही मुंबईतील जूहू येथे मतदान केले. पण यादरम्यान पुन्हा एकदा त्यांच्यातील ‘अँग्री वूमन’चे दर्शन घडले. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या जया बच्चन अचानक तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यावर भडकल्या.

जया बच्चन मुंबईतील जुहूच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचल्या. सून ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन हे दोघेही त्यांच्यासोबत होते. मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्यावर त्या प्रचंड भडकल्या. याचे कारण काय तर फोटो. होय, त्या अधिकाऱ्याने  जया यांच्याकडे फोटो काढण्याची विनंती केली. मग काय, निवडणूक अधिकाऱ्यानेच फोटो काढण्याची विनंती केल्यावर जयांचा पारा चढला आणि त्या जाम भडकल्या. ‘ मी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले आहे. तुम्ही निवडणूक अधिकारी आहात आणि कर्तव्यावर असताना तुम्ही अशाप्रकारे फोटो मागू शकत नाही. मी तुमची तक्रार करणार आहे,’ असे त्यांनी त्या अधिकाऱ्याला सुनावले. मतदान केंद्रावर हजर असलेल्या मीडियावरही त्या चिडलेल्या दिसल्या. यादरम्यान एका कॅमेरामनला धक्का देत रागारागाने आपल्या कार मध्ये जाऊन बसल्या.   

जया त्या अधिकाऱ्यावर प्रचंड चिडलेल्या असताना त्यांचा मुलगा अभिषेक आणि त्यांची सून ऐश्वर्या त्यांच्यासोबतच होते. आई चिडली असली तरी अभिषेक त्याचे मतदान करण्याचे काम करत होता तर ऐश्वर्या अतिशय शांतपणे तिथेच उभी राहिली होती. त्यांचे अधिकाऱ्यासोबत बोलणे झाल्यावर त्यांना मतदान करण्यासाठी ती घेऊन गेली. झी 24 तासने त्यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

जया बच्चन त्यांच्या रागासाठी ओळखल्या जातात. पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया फोटोग्राफर आणि चाहत्यांवर बरसल्या आहेत. 


Web Title: Aishwarya rai was just standing when jaya bachchan got angry while voting in mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.