विवेक ओबरॉयलाही अभिनयासोबतच भटकंतीची फार आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून तो आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतो. नेहमीच कामातून वेळ काढत आपल्या कुटुंबासह तो क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असतो. कोरोनामुळे लोक गेले काही दिवस घरातच बंदिस्त होते. लॉकडाऊन हटवल्यानंतर काही प्रमाणात जनजीवन सुरळीत सुरू होत आहे. अशातच सेलिब्रेटी व्हॅकेशनवर जात फुल ऑन मजा मस्ती करताना पाहायला मिळतायेत. बहुतेक सेलिब्रिटी यावेळी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना पाहायला मिळतायेत.

विवेक ओबेरॉयनेही आपल्या इन्स्टाग्रामवर कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटत असतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंटस देत पसंती देत आहे. विवेकनेही व्हॅकेशनसाठी मालदीवचीच निवड केली. सध्या तो मालदीव्हजमध्ये पत्नी आणि मुलांसह मजा मस्ती करतोय.

विवेक पत्नी प्रियंकासह रोमँटिक स्टाईलमध्ये दिसला.विवेकने फोटो शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. सूर्यास्त, जादूई वेळ. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केले आहे.काही फोटोंमध्ये  विवेक पत्नी प्रियंकाबरोबर समुद्रकिनारी सायकल चालवतानाचाही आनंद लुटत आहेत.तर दुस-या फोटोत दोन्ही मुलांसह बोटिंगचाही आनंद घेत आहे. 

विवेकने  आणि प्रियांकासह  2011 मध्ये लग्न केले होते. दोघांनाही दोन मुलं आहेत. विवान आणि अमेया असे या मुलांची नावं आहेत. विवेकने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की छोट्याशा विश्रांतीनंतर आता तो  पुन्हा कामावर पतला आहे. 

विवेक ऑबेरॉयच्या या एका चुकीमुळे आला होता विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा?

ऐश्वर्या आणि विवेक दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा  मीडियात असायच्या. मात्र  ऐश्वर्याने कधीच विवेक ओबरॉयसह प्रेमाची कबुली दिली नव्हती. विवेकने अप्रत्यक्षपणे या गोष्टीविषयी मीडियात सांगितले होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत असताना विवेकच्या एका चुकीने त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. विवेकने एक पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केला होता. सलमानने त्याला फोनवरून मारण्याची धमकी दिली असे त्याने या पत्रकार परिषदेत सांगितले होते. या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पण या सगळ्यात माझा काहीही संबंध नसल्याचे ऐश्वर्याने मीडियाला सांगितले होते आणि तेव्हापासून तिने विवेकसोबत बोलणेच बंद केले. सगळ्याप्रकारचा संपर्क तोडला. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aishwarya Rai Bachchan Ex Boyfriend Vivek Oberoi Enjoying Vacation In Maldives With Wife Priyanka And Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.