ठळक मुद्देविवेकने एक पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केला. सलमानने त्याला फोनवरून मारण्याची धमकी दिली असे त्याने सांगितले होते. या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पण यात माझा काहीही संबंध नसल्याचे ऐश्वर्याने मीडियाला सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर येईल, असे रविवारी प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमध्ये म्हटले गेले. साहजिकच एक्झिट पोलच्या या निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. विरोधकांची, एक्झिट पोलची खिल्ली उडवणारे अनेक मीम्स शेअर केले गेले. अभिनेता विवेक ओबेरॉय हाही याला अपवाद नव्हता. विवेकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम शेअर केले. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली.  

विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो आहेत. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय दिसतेय. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत आहे. यावर ‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले आहे. तिसऱ्या फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्याचा फोटो आहे आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले आहे. विवेकने हे मीम शेअर करताना त्यासोबत लाफिंग इमोजी पोस्ट केले आहेत. सोबत, ‘नो पॉलिटिक्स हिअर, जस्ट लाईफ’ असे लिहिले आहे. या मीम्समुळे त्याला सोशल मीडियावर नेटिझन्सने प्रचंड सुनावले. एवढेच नव्हे तर महिला आयोगानेदेखील त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या ट्वीटमुळे आपण चांगलेच वादात अडकलो आहे हे लक्षात येताच विवेकने हे ट्वीट डीलिट केले.

ऐश्वर्यामुळे विवेकने चर्चेत येणे हे काही पहिल्यांदा घडलेले नाहीये. काही वर्षांपूर्वी विवेक आणि ऐश्वर्याच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ऐश्वर्याचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्यापूर्वी तिचे मॉडेल राजीव मुलचंदानीसोबत अफेअर होते. पण काहीच वर्षांत त्यांच्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या यांची ओळख झाली आणि काहीच दिवसांत त्या दोघांच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगायला लागली. जवळजवळ दोन वर्षं तरी ते नात्यात होते. पण अमरउजाला या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्यासोबत नात्यात असताना सलमानने तिला फसवले होते आणि त्याचमुळे ऐश्वर्याने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पण ऐश्वर्याने आपल्या आयुष्यातून निघून जाणे सलमानला सहन होत नव्हते. त्यामुळे तिच्या चित्रपटांच्या सेटवर तो नेहमीच हंगामा करायचा. याचदरम्यान तिच्या आयुष्यात विवेक ऑबेरॉयची एंट्री झाली. क्यों हो गया ना या चित्रपटानंतर ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणांवर एकत्र दिसत असत. ऐश्वर्या आणि विवेक नात्यात असल्याची मीडियात चर्चा असली ती ऐश्वर्याने याची कधीच कबुली दिली नाही. पण विवेकने अप्रत्यक्षपणे या गोष्टीविषयी मीडियात सांगितले होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत असताना विवेकच्या एका चुकीने त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. 

विवेकने एक पत्रकार परिषद बोलावली होती आणि त्यात त्याने थेट सलमानवर आरोप केला. सलमानने त्याला फोनवरून मारण्याची धमकी दिली असे त्याने या पत्रकार परिषदेत सांगितले होते. या सगळ्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. पण या सगळ्यात माझा काहीही संबंध नसल्याचे ऐश्वर्याने मीडियाला सांगितले होते आणि तेव्हापासून तिने विवेकसोबत बोलणेच बंद केले. 

या सगळ्या गोष्टी घडल्या, त्यावेळी सलमान खान हा स्टार होता. ऐश्वर्याने देखील अनेक हिट चित्रपट दिले होते. पण विवेकचे करियर नुकतेच बॉलिवूडमध्ये सुरू झाले होते. या घटनेचा विवेकच्या करियरवर देखील चांगलाच परिणाम झाला. 
 


Web Title: vivek oberoi Aishwarya rai separated due to salman Khan?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.