'रात और दिन'च्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनने मागितली ऐवढी मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 05:49 AM2018-01-05T05:49:07+5:302018-01-05T11:19:07+5:30

रात और दिन बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येतो आहे. सत्येन बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रदीप कुमार, नर्गिस ...

Aishwarya Rai Bachchan asked for a big deal in 'Night and Day' remake | 'रात और दिन'च्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनने मागितली ऐवढी मोठी रक्कम

'रात और दिन'च्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चनने मागितली ऐवढी मोठी रक्कम

googlenewsNext
त और दिन बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येतो आहे. सत्येन बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रदीप कुमार, नर्गिस आणि फिरोज खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.  या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन दिसणार आहे हे तर आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे. या चित्रपटासाठी नर्गिस यांना नॅशनल अॅवॉर्डनेसुद्धा सम्मानित करण्यात आले होते. चित्रपटात कथा एका अशा महिले भवती फिरते जिला मल्टी पर्सनॉलिटी डिसऑर्डरचा आजार असतो. या चित्रपटाची निर्मिती प्रेरणा अरोरा करते आहे.  चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगची तयारी जोरात सुरु आहे.मीडिया रिपोर्टच्या अनुसार फन्ने खां मध्ये बिझी आहे. मात्र रात और दिनच्या रिमेकमध्ये काम करण्यासाठी ऐश्वर्याने 10 कोटींचे मानधन मागितले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या रायचा डबल रोल असणार आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे. ऐश्वर्याच्या डिमांड निर्मात्यांनी मान्य केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी ऐश्वर्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे. यादरम्यान जर ऐश्वर्याकडे एखाद्या दुसऱ्या चित्रपटाची ऑफर आली तर तिला ती नाकारावी लागेल. त्यामुळे ऐश्वर्याने केलेली डिमांड ही योग्य आहे. ऐश्वर्या पहिल्यांदाच कोणत्या चित्रपटात डबल रोल करताना दिसणार आहे.  या चित्रपटात ऐश्वर्यासोबत संजय दत्त ही दिसणार आहे. 

ALSO READ  :  Shocking ! ​ऐश्वर्या राय बच्चन माझी आई; २९ वर्षीय युवकाने केला दावा!!

लवकरच ऐश्वर्याचा फन्ने खां हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फन्ने खां’ एक म्युझिकल कॉमेडी चित्रपट असून, त्यामध्ये ऐश्वर्याबरोबर अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला अतुल मांजरेकर दिग्दर्शित करीत आहेत.‘फन्ने खां’ आॅस्कर नॉमिनेटेड ‘एव्हरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा आॅफिशियल रिमेक आहे. अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय तब्बल दोन दशकांनंतर एकत्र काम करीत आहेत. या चित्रपटात ऐश्वर्या एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan asked for a big deal in 'Night and Day' remake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.