वयाच्या ४५ व्या वर्षी गदरच्या सकीनाने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार,बिकीनीमध्ये दिल्या अशा पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:09 PM2021-09-16T16:09:43+5:302021-09-16T16:10:22+5:30

अमीषा पटेलने अभिनेत्री म्हणून क्वचितच तीन -चार चित्रपटात झळकली असेल.जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

At the age of 45, Gadar's Sakina Aka Amisha patel crossed all bounds of boldness and posed in a bikini | वयाच्या ४५ व्या वर्षी गदरच्या सकीनाने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार,बिकीनीमध्ये दिल्या अशा पोज

वयाच्या ४५ व्या वर्षी गदरच्या सकीनाने बोल्डनेसच्या सर्व हद्द केल्या पार,बिकीनीमध्ये दिल्या अशा पोज

Next

'कहो ना प्यार है' सारख्या सुपरहिट चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अमीषा पटेलने अभिनेत्री म्हणून क्वचितच तीन -चार चित्रपटात झळकली असेल.जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या चित्रपटांमध्ये 'गदर: एक प्रेम कथा', 'हमराज' आणि तमिळ चित्रपट 'पुडिया गीथे' यांचाही समावेश आहे.

अमीषा पटेलने तिच्या कारकिर्दीत 'ये है जलवा', 'परवाना, एलन, जमीर, वाद यासारख्या अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. 2005 मध्ये अमीषाला आमिर खानसोबत मंगल पांडेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट देखील फार काही कमाल दाखवू शकला नाही. हिंदी व्यतिरिक्त, अमीशाने तिच्या कारकिर्दीत तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे.


आतापर्यंत सुमारे 35 चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमीषाने आपल्या करिअरमध्ये हृतिक रोशन, सनी देओल, बॉबी देओल, सलमान खान, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय दत्त आणि अक्षय खन्ना सारख्या स्टार्ससोबत काम केले, पण त्याचा फायदा फारसा झाला नाही . हृतिक रोशन, सनी देओल आणि बॉबी देओल वगळता इतर हिरो असलेल्या अमीषाच्या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही.


रुपेरी पडद्यावर आमिषाची जादू चालली नसली तरी तिचे बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र घायाळ होत असतात. पूर्वीपेक्षा ती आता जरा जास्तच बोल्ड झाल्याचे पाहायला मिळते.वेस्टर्न आउटफिट्सपासून ते पारंपरिक पेहरावापर्यंत, सर्वच प्रकारच्या स्टाइल कॅरी करून ती लोकांचं लक्ष वेधून घेते.तिचा बिकीनी लूकनेही सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता.

अमिषाच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ती 1992 मध्ये टफट्स युनिव्हर्सिटीमधून एकोनॉमिक्समध्ये पदवी मिळवली आहे. उच्चशिणासाठी ती अमेरिकेला गेली होती.

अमीशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या आई-वडिलांशी तिचे अजिबात पटत नाही.आई- वडिलांसोबत बऱ्याच काळापासून संपत्तीवरुन वाद सुरु आहेत. अमिषाने तिच्या वडिलांवर 12 कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील तिच्या पैशांचा गैरवापर करतात. अमिषाने एकदा माध्यमांसमोरही सांगितले की तिच्या आईने तिला चप्पलाने मारहाण केल्यानंतर तिला घराबाहेर काढले होते.
 

Web Title: At the age of 45, Gadar's Sakina Aka Amisha patel crossed all bounds of boldness and posed in a bikini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app