बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आपला आणखी एक बहुप्रतीक्षित चित्रपट 'दोबारा' सोबत प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


दोबारा चित्रपटातून तापसी पन्नू पुन्हा एकदा पवैल गुलाटी सोबत दिसणार आहे. पवैल गुलाटीसोबत तापसी थप्पड चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला रिलीज होऊन एक वर्ष झाली आहेत. या चित्रपटाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी आणि प्रतिभाशाली अभिनेत्यासोबत आपल्या रीयूनियनची घोषणा करताना, तापसीने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. 


अभिनेत्री तापसीने 'दोबारा'च्या सेटवरून पवैल सोबत एक कँडिड फोटो शेअर करत लिहिले," माझी शेवटची सीरिज दोबारा. काही सहयोग पुनरावृत्ती करण्यास पात्र आहेत. या माणसाचा थप्पडमध्ये काही अपूर्ण व्यवसाय होता त्यामुळे त्याची चूक सुधारण्याची ही संधी आहे. पवैल गुलाटी. आज बरोबर थप्पडच्या एक वर्षानंतर मी आशा करू शकते की तो पुन्हा दोबारा गमावणार नाही.


'दोबारा' अनुराग कश्यप दिग्दर्शित असून एकता कपूर यांची कल्ट मूवीज़ आणि सुनीर खेतरपाल यांच्या एथेना द्वारा संयुक्त निर्मिती आहे. तापसीचे चाहते थप्पडनंतर पुन्हा एकदा तिला पवैल गुलाटीसोबत रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 


बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत: ला सिद्ध केले आहे. बॉलिवूडमध्ये तिने एक से बढकर एक भूमिका साकारत रसिकांचीही पसंती मिळवली आहे. आगामी काळातही ती 'रश्मी रॉकेट', 'हसीन दिलरुबा', 'गुण गण मना' आणि 'लूप लपेता' या सिनेमांमध्ये काम करताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After 'Thappad', Tapsi Pannu will be seen again with Paval Gulati in Anurag Kashyap's movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.