after sunny leone neha kakkar tops from a college of west bengal | सनी लिओनीपाठोपाठ नेहा कक्करही बनली ‘कॉलेज टॉपर’; बातमी वाचून व्हाल थक्क

सनी लिओनीपाठोपाठ नेहा कक्करही बनली ‘कॉलेज टॉपर’; बातमी वाचून व्हाल थक्क

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपूर्वी सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये अभिनेत्री सनी लिओनीचे नाव झळकले हेते.

पश्चिम बंगालच्या तीन कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये टॉपवर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे नाव पाहून सगळ्यांचे डोके फिरले होते. आता पुन्हा एकदा असाच घोळ समोर आला आहे. सनी लिओनीनंतर एका कॉलेजच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या मेरिट लिस्टमध्ये बॉलिवूड सिंगर नेहा कक्करचे नाव टॉपर म्हणून झळकलेय.
 पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या मेरिट लिस्टमध्ये हा घोळ दिसून आला. माणिकचक कॉलेजच्या वेबसाईटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण लिस्टमध्ये टॉपवर नेहा कक्करचे नाव होते. तिचे नाव पाहून सगळीकडे चर्चा सुरु झाली आणि तेव्हा कुठे कॉलेज प्रशासनाला जाग आली.  

कॉलेज प्रशासनाने तातडीने ही चूक दुरूस्त करत नवीन यादी जाहीर केली. दरम्यान यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली आहे, असे माणिकचक कॉलेज प्राचार्य अनिरुद्ध चक्रवर्ती यांनी सांगितले. काही खोडकर वृत्तीच्या लोकांनी केलेले हे कृत्य निंदनीय आहे.  मेरिट लिस्टमध्ये अशाप्रकारची नावं टाकून उच्च शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे अनिरूद्ध चक्रवर्ती यावेळी म्हणाले.


  
यापूर्वीच्या याद्यांमध्येही मिया खलिफा, सनी लिओनी, डेनी डेनियल्सचे नाव
गेल्या काही दिवसांपूर्वी सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये अभिनेत्री सनी लिओनीचे नाव झळकले हेते. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील बारासात शासकीय महाविद्यालयाच्या शनिवारी जारी झालेल्या इंग्रजी ऑनर्सच्या यादीत तिस-या स्थानावर सनी लिओनीचे नाव होते. याच जिल्ह्यातील बज बज कॉलेजच्या बीए अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश यादीतही सनी लिओनीचे नाव होते. इतकेच नाही तर कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजच्या इंग्रजी ऑनर्सच्या प्रवेश प्रक्रिया यादीच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनीचे नाव टॉपवर झळकले होते.त्यापूर्वी अशाच यादींमध्ये अमेरिकन पॉर्न स्टार डेनी डेनियल्स आणि लेबनॉनची वेबकॅम मॉडेल मिया खलिफा हिचे नावही झळकले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: after sunny leone neha kakkar tops from a college of west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.