After Sonu Sood, Swara Bhaskar sends 1000 migrant workers to Bihar TJL | सोनू सूदनंतर प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी धावून आली स्वरा भास्कर, 1350 लोकांना पोहचवले त्यांच्या घरी

सोनू सूदनंतर प्रवासी मजूरांच्या मदतीसाठी धावून आली स्वरा भास्कर, 1350 लोकांना पोहचवले त्यांच्या घरी

कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. लाखोंच्या संख्येत लोक आपापल्या घरापासून शहरांमध्ये अडकल्या आहेत. त्यामुळे प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटी पुढे आले आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत अनेक प्रवासी मजूर, विद्यार्थी व महिलांना त्यांच्या घरी पोहचवले आहे. आता या मोहिमेत अभिनेत्री स्वरा भास्करही सामील झाली आहे. आतापर्यंत स्वराने दिल्लीत अडकलेल्या 1350 प्रवासी मजूरांना बिहार व उत्तर प्रदेशमधील त्यांच्या घरी पोहचवले आहे. 

अभिनेत्री स्वरा भास्करने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अशा वेळी जेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. अत्याधिक कष्टाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत मी घरी बसले आहे, याची मला लाज वाटते. या संकटात आपल्या व्यवस्थेमधील नाकर्तेपणादेखील प्रकाशझोतात आला आहे.


स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील लोकांना 500 जोडी चप्पलादेखील वाटल्या होत्या. स्वरा ट्विटरवर खूप एक्टिव्ह आहे आणि ती नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहते.


मात्र आता तिने दाखवलेल्या माणूसकीमुळे सगळीकडून तिचे खूप कौतूक होत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After Sonu Sood, Swara Bhaskar sends 1000 migrant workers to Bihar TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.