लेस्बियन बनण्यासाठी ही अभिनेत्री करते इतका खटाटोप, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:00+5:30

सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कॅटरिना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता.

After Sonam Kapoor, Zareen Khan To Play A Lesbian In Her Next Film Akele Hum, Akele Tum-SRJ | लेस्बियन बनण्यासाठी ही अभिनेत्री करते इतका खटाटोप, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

लेस्बियन बनण्यासाठी ही अभिनेत्री करते इतका खटाटोप, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

googlenewsNext

कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेतात. अभिनेत्री जरीन खानही त्याच कलाकारांपैकी एक आहे.  लवकरच  ‘हम भी अकेले तुम भी अकेले' सिनेमामध्ये ती दिसणार आहे. यात ती एका लेस्बियनची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी ती प्रचंड मेहनत घेत असून तिने एक-दोन नव्हे तर 5 ते 6 किलो वजन वाढवले आहे.  या सिनेमातील भूमिका लेस्बियनची असून मानसी असे तिचे नाव असते. 


मानसीला भरपूर खाण्याची आवड असते . त्यामुळे जाडजुड दिसण्यासाठी तिने आपला व्यायामही बंद केला आहे.समलैंगिक किंवा लेस्बियन लव्हस्टोरीसारखा बोल्ड विषयाच्या माध्यमातून जरीन रसिकांच्या भेटीला येणार आहे. चाकोरीबाहेरील चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांची मनं जिंकण्याचा जरीनचा प्रयत्न आहे.


सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून जरीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. कॅटरिना कैफसारखी दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता. 'हाऊसफूल २', 'हेट स्टोरी ३' या सिनेमातही ती दिसली होती.'वीर' या सिनेमाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. 

Web Title: After Sonam Kapoor, Zareen Khan To Play A Lesbian In Her Next Film Akele Hum, Akele Tum-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.