After returning from mumbai to chandigarh kangana ranaut quarantined | मुंबईहून चंदीगडला परताच अभिनेत्री कंगना राणौत झाली क्वारंटाईन, पुन्हा होणार covid-19 टेस्ट

मुंबईहून चंदीगडला परताच अभिनेत्री कंगना राणौत झाली क्वारंटाईन, पुन्हा होणार covid-19 टेस्ट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत चार दिवसांच्या मुंबईतील मुक्कामानंतर हिमाचल प्रदेशात आपल्या घरी परतली आहे. मुंबईहून चंदीगडला परतल्यानंतर तिला 10 दिवस क्वारंटाईन केले आहे. मुंबई कंटेनमेंट झोन असल्यामुळे खबरदारी म्हणून हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागाने कंगनाला क्वारंटाईन केलं आहे. पुढील 10 दिवस कंगना कुठेही बाहेर जाऊ शकणार नाही. क्वारंटाईन काळ संपण्याच्या आधी कंगनाची पुन्हा एकदा कोव्हिड 19ची टेस्ट होईल. या टेस्टच्या रिपोर्टनंतर कंगनाचा क्वारंटाईन काळ संपणार की नाही ते ठरणार आहे. चंदीगड येथे पोहोचताच कंगनाने एक ट्विट करून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


 
कंगनानं ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली होती. तिनं ट्विटमध्ये पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला होता. 'मी मुव्ही माफिया, सुशांतचे मारेकरी आणि ड्रग रॅकेटला उघडं पाडतेय, हीच गोष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्रासदायक ठरतेय. मुख्यमंत्र्यांचे लाडके पुत्र आदित्य ठाकरे ज्यांच्यासोबत फिरतात, त्यांना मी उघडं पाडतेय, हीच त्यांची समस्या आहे. हाच माझा सर्वात मोठा गुन्हा आहे,' असं ट्विट कंगनानं केलं होतं.

 

मुंबईतून निघतानाही कंगनाने शेरोशायरीतून निशाणा
कंगनाने ट्विटमध्ये म्हटले होते की, जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धडियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमजोर समझ कर, बहुत बडी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणौतने, महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचे वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. तसेच मला कमकुवत समजण्याची मोठी चूक केली. एका महिलेला घाबरवत तिच्यावर अन्याय करत स्वत:ची प्रतिमा मलीन करत असल्याचेही कंनाने म्हटले होते.

तर ती मला क्लॅप बॉय बनवेल...! कंगना राणौतबद्दल बोलले विक्रम भट

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After returning from mumbai to chandigarh kangana ranaut quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.