बॉलिवूडमध्ये फार कमी चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री जिया खान हिचा आज जयंती असून आता ती या जगात नाही. जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी, १९८८ साली झाला होता. तिने मोजक्याच चित्रपटात काम केले होते. तिने मनीषा कोईराला अभिनीत दिल सेमधून बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. त्यानंतर ती निशब्द चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होते. याशिवाय तिने आमीर खान सोबत गजनी चित्रपटात काम केले होते. शेवटची ती हाऊसफुल चित्रपटात झळकली होती. ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या मृत्यूमुळे चर्चेत आली होती.


जिया खानचा मृत्यू ३ जून, २०१३ ला झाला होता. तिने घरात फास लावून घेतला होता.

तिची हत्या होती की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु तिच्या मृत्यूमागे अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीचा हात होता असं बोललं गेलं होतं.

 

त्यावेळी पोलिसांनी सूरज पांचोलीला अटकदेखील केली होती.

त्याच्यावर शंका घेण्यामागे कारण होते की मरण्यापूर्वी जियाने शेवटचे सूरजसोबत बोलली होती आणि त्यानंतर काही मिनिटांनंतर तिने फास लावून घेतली होती. त्यावेळी तिथे सुसाइड नोटदेखील मिळाली होती व तिची आई राबिया खानने मीडियाच्या माध्यमातून ही नोट समोर आली होती. यावेळी तिच्या आईचे म्हणणे होते की सूरज पांचोलीने जियाशी वाईट पद्धतीने वागून तिला कमजोर केले होते. त्यामुळे तिने आत्महत्यासारखा पर्याय अवलंबला.


जिया खानने सुसाइड नोटमध्ये लिहिले होते की, मी तुझ्यावर प्रेम केले आणि त्याबदल्यात मला शिव्या, बलात्कार व शारीरिक त्रास मिळाला. असे असतानाही मी सर्व काही सहन केले आणि तुझ्यावर प्रेम करत राहिले. मी तुझ्यावर प्रेम केले पण तू तुझ्या पार्ट्या व मुलींमध्ये गुंग झाला होतास. तू मला फसविले आहे. तू हे ज्यावेळी वाचत असशील तेव्हा कदाचित मी खूप दूर निघून गेलेले असेन. तुझ्या प्रेमापोटी मी घरी यायचे. तुझा मूड बदलला तर मला रात्री घराबाहेर काढायचा. माझ्या तोंडावर दिवसरात्र खोटे बोलत होतास. माझ्या कुटुंबाबद्दल घालून पाडून बोलत होता. तुला भेटण्यासाठी मी तरसायचे आणि वेड्यासारखी पाठलाग करायचे. 

जियाने सुसाइड नोटमध्ये बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात तिने प्रेग्नेंट राहिल्याचेही लिहिले होते. 

Web Title: After rape Jiah Khan got her child aborted, boyfriend used to torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.