बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्या लग्न झाल्यानंतर काही खासगी कारणांमुळे बॉलिवूडमधून गायब झाल्या आहेत. तशीच अभिनेत्री आहे गीता बसरा. गीताने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले होते. मात्र हरभजन सिंगसोबत लग्नानंतर ती लाइमलाइटपासून दूर गेली. गीता बसराची एक मुलगी देखील आहे आणि सध्या गीता बसरा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप व्यस्त आहे. 

गीता बसराने चार-पाच वर्षे लंडनमध्ये थिएटरमध्ये काम केले त्यानंतर ती मुंबईला आली. मुंबईमध्ये तिने किशोर नमितच्या एक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. यानंतर तिला बॉलिवूडमध्ये काम मिळाले. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगसुद्धा केले होते.

गीता बसराने २०१५ मध्ये भारतीय संघाचा स्पिनर हरभजन सिंगसोबत लग्न केले. लग्नाच्या अगोदर ते अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. गीता बसरा लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेली. गीता बसराने द ट्रेनमध्ये इमरान हाशमीसोबत बरेच किसिंग सीन आणि बोल्ड सीन दिले होते. तरीही तिचे करियर पुन्हा रुळावर आले नाही.

 


गीता आणि हरभजन सिंगला एक मुलगी असून तिचे नाव नाया आहे.

गीता भलेही लाइमलाइट पासून दूर आहे परंतु ती सोशल मिडियावर खूपच एक्टिव असते आणि नेहमी तिचे आणि तिच्या मुलीचे फोटो शेअर करत असते. 

Web Title: After getting married to Harbhajan Singh, the actress not working in bollywood Tjl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.