‘जुग जुग जियो’ या चित्रपटासाठी सर्व कलाकारांनी कंबर कसली आहे. आजपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन दिसणार आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच कामावर परतली आहे. त्यांचे धैर्य आणि त्यांचे कार्य पाहून अनिल कपूर यांनी त्यांच्यासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.अनिल कपूर यांनी ट्विटरवर लिहिले की, "मिसेस जेम्स परतल्यावर मला खूप आनंद झाला आहे. " आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज आहाता.‘जुग जुग जिओ’ चित्रपटात झळकणार असल्यामुळे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्साहित आहे. यासह अनिल कपूरने नीतू कपूरचा हसरा फोटो शेअर केला आहे.

चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. जुग जुग जियो असे या चित्रपटाचे नाव आहे. ज्यामध्ये वरुण धवन आणि कियाराची जोडी दिसणार आहे. दिवाळीनंतर  भाऊ बीजचे निमित्तसाधत चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे.ऋषी कपूरला यांचे निधन होवून  जवळपास 6 महिने झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर पहिल्यांदाच कामावर परतली आहे. 'जुग जुग जियो' चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये होत आहे. या चित्रपटासाठी संपूर्ण टीम चंदीगढमध्ये पोहोचली आहे. 

राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे.आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अनिल कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे चित्रपटात कियारा आणि वरुण धवन  यांच्याही भूमिका आहेत.चित्रपटाच्या शूटिंग सुरू करण्यापूर्वी नीतू कपूरला ऋषी कपूर यांची आठवण झाली.

सध्या या  भयंकर काळात मी हवाईमार्गाने प्रवास करणार असल्याचे तिने सोशल मीडियावर लिहिले आहे. मला थोडी चिंता वाटत असून मनात भीतीही आहे. नुकतीच कियारा अडवाणी 'लक्ष्मी' या चित्रपटात दिसली. आता ती नव्या प्रोजेक्टमध्येही बिझी झाली आहे. याशिवाय ती 'शेरशांह'चित्रपटात दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After a big break, Neetu Kapoor is shooting working with Anil Kapoor for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.