'खिलाडियो को खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही. प्रत्येक कामात एव्हरेडी असणारा सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच खिलाडी अक्षयच्या यशाचे खरं कारण आहे. त्यामुळेच आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे.  कारण अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून  प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो. आत्तापर्यंत तो प्रत्येक चित्रपटासाठी २७ कोटी मानधन घेत असे. 


मात्र वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याने त्याचं मानधन दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय.  मानधन दुप्पट केल्यापासून अक्षय कुमारचे सगळे आवडी-निवडीही बदलल्या आहेत. याचीच प्रचिती त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे आली आहे. नुकतेच बायको  ट्विंकल खन्नाला एक छानसे सरप्राईज दिले आहे. 


सध्या याच सरप्राईज गिफ्टची सर्वत्र  चर्चा  होत आहे.  अक्षयनं ट्विंकल खन्नाला दिलेलं गिफ्ट होतं कांद्याचे झुमके. हे गिफ्ट पाहून ट्विंकल खन्नानेही पतीचे कौतुक करत सोशल मीडियावर फोटो शेअर करत पती अक्षयचे कौतुक केले आहे. यावेळी तिने एक समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. नक्कीच हे गिफ्ट पाहून तुम्हालाही हसू आवरणे कठिण झाले असणार हे मात्र नक्की. यावरून अक्षय जे काही करतो ते हटके असते हेच स्पष्ट होते.

या दोघांची लव्हस्टोरी ही तशी रंजक आहे. लग्न करण्याआधी ट्विंकलने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. ट्विंकलने त्याला सांगितले होते की, माझा लवकरच प्रदर्शित होणारा 'मेला' हा सिनेमा फ्लॉप ठरला तरच मी तुझ्याशी लग्न करेन. हा सिनेमा फ्लॉप ठरला आणि त्या दोघांनी 7 जानेवाली 2001 मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायनरांच्या घरी 50 लोकांच्या उपस्थितीत झाले होते.

 

Web Title: After Ambani, Akshay Kumar gave his wife the most expensive gift, you will be amazed to read too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.