मनिषा कोईराला हिने नुकताच ४९वा वाढदिवस साजरा केला. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ चित्रपटातून मनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्यानंतर मनीषाच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर मनीषाने ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि मनीषा लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने अग्नि साक्षी, इंडियन, गुप्त: द हिडन ट्रूथ, कच्चे धागे, कंपनी आणि एक छोटी सी लव स्टोरी या चित्रपटांमध्ये काम केले.

नाना पाटेकर यांनी अग्निसाक्षी या चित्रपटात मनिषा कोईराला सोबत काम केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. एवढेच नव्हे तर ते दोघे लग्न देखील करणार होते.

मनिषा आयुष्यात येण्याआधी नाना यांचे लग्न झालेले होते. पण नाना आणि मनिषा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. ते दोघे लग्न करणार असेच सगळ्यांना वाटत असतानाच आयशा जुल्का नानाच्या आयुष्यात आली आणि मनिषा आणि नानाच्या नात्यात दुरावा आला.


नाना आणि आयशा यांनी २००३ साली आंच या चित्रपटात काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे म्हटले जाते. नाना आणि आयशा नात्यात आहे हे कळल्यावर मनिषा चांगलीच भडकली होती. एकदा मनिषा नानाला भेटायला गेली होती. त्यावेळी नानाच्या रूममध्ये आयशा होती. आयशाला पाहून मनिषाची तळपायाची आग मस्तकात गेली.

मनिषा आयशावर आरडाओरड करायला लागली. हे सगळे पाहून आयशा देखील चिडली. एवढेच नाही तर या दोघांमध्ये आता मारामारी होतेय का असेच नानाला वाटू लागले होते. पण नानाने मनिषाला समजावून शांत केले. या सगळ्या प्रकरणानंतर लग्न करण्यासाठी मनिषा नानाच्या सतत मागे लागली होती. पण नानाचे लग्न झाले होते आणि तो पत्नीला घटस्फोट द्यायला देखील तयार नव्हता. या सगळ्यामुळे मनिषाने त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. पण मनिषा नानाच्या आयुष्यातून पूर्णपणे गेल्यानंतर नाना आयशासोबत अनेक वर्षं लीव्ह इन मध्ये राहात होता असे म्हटले जाते. 


अखेर १९ जून २०१०मध्ये मनीषा कोईरालाने नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलसह लग्न केले.

 

मनीषा आणि सम्राटची ओळख एका सोशल नेटवर्किंग साईटद्वारे झाली होती. परंतु त्या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. २०१२मध्ये मनीषा आणि सम्राट विभक्त झाले.


Web Title: In an affair with Manisha Koirala, a Marathi actor, the actress had a breakup
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.