'लंडन ड्रीम्स' या सिनेमातून आदित्य रॉय कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सिनेमात आदित्य सलमान खान आणि अजय देवगण सोबत दिसला होता.  खूप कमी लोकांना हे माहिती आहे की, आदित्य हा विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूरचा लहान भाऊ आहे. कॉलेजच्या दिवसांत असताना आदित्य हेमा मालिनी आणि धर्मेन्द्र यांची मुलगी अहाना हिच्या प्रेमात होता. त्याच दरम्यान रणवीर सिंग देखील अहानाच्या प्रेमात होता. मात्र आदित्यसाठी अहानाने रणवीरला डिच केले आणि या लव्हस्टोरीला ब्रेक लागला.


खुद्द रणवीरने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ‘ज्युनिअर कॉलेजमध्ये ती प्रत्येक मुलाची फँटसी होती. तिच्यासाठी मी 4-5 वर्षे अक्षरश: वेडा झालो होतो. आज ती विवाहित आहे. मी तिच्यावर भाळलो होतो आणि ती आदित्य राय कपूरवर. अखेर एक दिवस आमचे ब्रेकअप झाले. ती आदित्यसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे मला कळले होते,’असे रणवीरने या मुलाखतीत सांगितले होते. ही मुलगी अहाना होती.


ब्रेकअपनंतर रणवीर शिकण्यासाठी विदेशात केला. पुढे चित्रपटात आला. दुसरीकडे अहाना दिल्लीचा बिझनेसमॅन वैभव वोहरासोबत लग्न करून मोकळी झाली.


अहाना ही धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी यांची लहान मुलगी. मोठी बहीण ईशा देओलपेक्षा ती पाच वर्षांनी लहान आहे. ईशाप्रमाणेच अहाना हिनेही बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. ‘तुम जानो न हम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात तिने ईशा देओलच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. पण यानंतर अहानाने बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले. साहजिकच बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून ती दूर झाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Aditya roy kapur birthday special unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.