Aditi Govitrikar father passed away | अदिती गोवित्रीकरवर कोसळला दुःखाचा डोंगर
अदिती गोवित्रीकरवर कोसळला दुःखाचा डोंगर

मॉडेल, अभिनेत्री व सायकोलॉजिस्ट अदिती गोवित्रीकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिला पितृशोक झाला आहे. 


अदिती गोवित्रीकर हिचे वडील गेल्या काही दिवसांपासून पनवेल येथील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. अदिती गोवित्रीकर देखील गेल्या तीन दिवसांपासून पनवेलमध्येच वास्तव्यास होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अदितीच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले.

अदिती गोवित्रीकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट 'स्माईल प्लीझ'मध्ये ती झळकली होती. ती अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला रिएलिटी शो बिग बॉस ३, अक्षय कुमारचा शो खतरों के खिलाडी सीझन १ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. अदिती टी सीरिजच्या कोई जाने ना या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमायरा दस्तूरही दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

Web Title: Aditi Govitrikar father passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.