अभिनेत्री समीरा रेड्डी अंडर वॉटर प्रेग्नंसी फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. समीराने नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. आता समीरा दुस-यांदा आई बनली आहे. खुद्द समीरानेच आपल्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून  ही खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे. शेअर केलेल्या फोटोत बाळाचा पूर्ण फोटो नसून फक्त हाताच्या पंजाचा फोटो शेअर केला आहे. ही बातमी बघताच तिच्या चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


प्रेग्नसीच्या काळात समीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह होती. आपल्या विषयीच्या सगळ्या गोष्टी ती तिच्या चाहत्यांसह शेअर करायची. प्रेग्नंट असल्याची बातमीही तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती. त्यावेळी तिने केलेले फोटोशूटने सा-यांचे लक्ष वेधले होते. फोटोशुटमधले निवडक फोटो तिने चाहत्यांसह शेअऱ केले होते. या फोटोंना तिने कॅप्शन देत म्हटले होते की, 'प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या स्थितीत आणि साइजमध्ये असतो. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत स्वत:वर प्रेम करायला पाहिजे.’ अनेकांनी या फोटोंवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी यावरून टीकाही केली होती.‘आता एवढेच पाहायचे राहिले होते, असे एकाले लिहिले.  तर काहींनी फोटोशूटच्या नावावर बाळाला का त्रास देते आहेस,असे लिहिले होते.


लग्नानंतर समीरा रेड्डी बॉलिवूडपासून लांबच गेली होती. चित्रपटसृष्टीपासून लांब जात तिने संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला दिला होता. २०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. २१ जानेवारी २०१४ रोजी समीराने मराठमोळा उद्योजक  अक्षय वदेर्सोबत लग्न केले होते.  ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी घोडीवर नव्हे तर बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता. २५ मे २०१५ रोजी समीराने आपल्या पहिला मुलाला जन्म दिला होता.


Web Title: Actress Sameera Reddy Blessed With the Baby Girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.