कंगनाने शेअर केले बोल्ड फोटो; स्वत:ला म्हटले,‘हॉट संघी’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:52 PM2021-06-10T17:52:02+5:302021-06-10T17:52:46+5:30

चर्चेत कसे राहायचे, हे कंगना राणौतला अगदी उत्तमरित्या कळते. ट्विटर अकाऊंट बंद झाल्याने सध्या कंगना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे आणि नवनव्या पोस्ट शेअर करत चर्चेत आहे.

actress Kangana Ranaut sharing pictures wrote hot sanghi | कंगनाने शेअर केले बोल्ड फोटो; स्वत:ला म्हटले,‘हॉट संघी’

कंगनाने शेअर केले बोल्ड फोटो; स्वत:ला म्हटले,‘हॉट संघी’

Next
ठळक मुद्देकंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘थलायवी’ या सिनेमात दिसणार आहे.

चर्चेत कसे राहायचे, हे कंगना राणौतला (Kangana Ranaut) अगदी उत्तमरित्या कळते. ट्विटर अकाऊंट बंद झाल्याने सध्या कंगना फेसबुक व इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे आणि नवनव्या पोस्ट शेअर करत चर्चेत आहे. तूर्तास कंगनाने इन्स्टावर स्वत:चे दोन बोल्ड फोटो शेअर केले आहे. सोबत स्वत:ला ‘हॉट संघी’ म्हटले आहे. (actress Kangana Ranaut sharing pictures wrote hot sanghi)
 इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला कंगनाने हे दोन फोटो शेअर केले आहेत.  या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. हे फोटो शेअर करण्याचे प्रयोजन काय तर हेटर्सला उत्तर. होय, हेटर्सला उत्तर म्हणून तिने हे फोटो शेअर केले आहेत.  पहिल्या फोटोमध्ये कंगनाने गोल्डन बिकिनी परिधान केली आहे. लिबरल्स: संघी महिला हॉट नसतात... मी: जरा माझी बियर पकडा, अशा  आशयाचे कॅप्शन तिने पहिल्या फोटोला दिले आहे.

एकंदर काय तर हे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे कंगनाने स्वत:ला संघी म्हटले आहे. संघी महिला असे कपडे देखील परिधान करु शकतात, हेही तिने सांगितले आहे.
सोशल मीडियावर एक ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने हे फोटो शेअर केले आहेत. या ऑडिओत संघ परिवाराशी संबंधित महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘थलायवी’ या सिनेमात दिसणार आहे. तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा प्रदर्शनासाठी तयार आहे. यात कंगना जयललितांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.  तेजस आणि  धाकड हे कंगनाचे आणखी दोन सिनेमेही येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress Kangana Ranaut sharing pictures wrote hot sanghi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app