actress gita siddharth kak passed away in mumbai | अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन
अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन

ठळक मुद्दे70 व 80 च्या दशकात गीता यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपटांत काम केले.

परिचय, शोले, त्रिशूल, राम तेरी गंगा मैली, नूरी अशा सुपरहिट चित्रपटांत झळकलेल्या अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे मुंबईत निधन झाले. काल 14 डिसेंबरला त्यांनी अंतिम श्वास घेतला. सुप्रसिद्ध टीव्ही होस्ट व निर्माता सिद्धार्थ काक यांच्या त्या पत्नी असलेल्या गीता यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या. 

गीता सिद्धार्थ काक यांनी ‘परिचय’ या गुलजार दिग्दर्शित चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात जितेन्द्र व जया भादुडी मुख्य भूमिकेत होते. 1973 मध्ये प्रदर्शित ‘गरम हवा’ या चित्रपटातील गीता यांच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते.

70 व 80 च्या दशकात गीता यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपटांत काम केले. गमन, शौकिन, देश प्रेमी,अर्थ, मंडी, निशान अशा चित्रपटांचा यात समावेश आहे. गीता यांनी सिद्धार्थ काक यांच्याशी लग्न केले. दोघांना अंतरा नावाची एक मुलगी आहे.

सिद्धार्थ काक यांना ‘सुरभी’ या टीव्ही शोने अपार लोकप्रियता दिली होती. 1990 ते 2001 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या शोच्या गीता या आर्ट डायरेक्टर होत्या. गीता  चित्रपटांशिवाय समाजकार्यातही सक्रिय होत्या. 

Web Title: actress gita siddharth kak passed away in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.