ठळक मुद्देदिव्याने आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर भावूक अशी पोस्ट केली होती.

गेल्या काही महिन्यांत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. अशात रविवारी आणखी एका अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका असलेल्या दिव्या चौकसे हिचे कॅन्सरमुळे निधन झाले.
अभिनेता साहिल आनंद याने त्याच्या सोशल अकाऊंटवर दिव्याच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.  दिव्याची बहीण सौम्या अमीश वर्माने देखील दिव्याच्या निधनाबाबत माहिती दिली आहे.

2011 साली दिव्या मिस युनिव्हर्समध्ये सहभागी झाली होती. 2016 साली तिने ‘है अपना दिल  तो आवारा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 2018 साली दिव्याने ‘पटियाले दी क्वीन’ हे पहिले गाणे गायले. दिव्या दीर्घकाळापासून कॅन्सरने ग्रस्त होती.  

तिच्या मृत्यूने बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर शोकसंदेश लिहित तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

त्या अखेरच्या पोस्टने सगळ्यांनाच केले भावूक

दिव्याने आपल्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर भावूक अशी पोस्ट केली होती. ‘मी जे सांगणार आहे, त्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. शब्द भरपूर असले तरी ते कमी आहेत. काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला उत्साह वाढवणारे अनेक मॅसेज येत होते. पण आता मी सांगू इच्छिते की, आता मी मृत्यूशय्येवर आहे. मी खूप मजबूत आहे. पण कृपा करून आता मला काहीही प्रश्न विचारू नका. केवळ परमेश्वराला ठाऊक आहे की,  तुम्ही माझ्यासाठी काय आहात,’ अशी भावूक करणारी पोस्ट दिव्याने मृत्यूपूर्वी लिहिली.
 
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress divvya chouksey has passed away after losing battle with cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.