actress disha patani father tested coronavirus positive | अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना कोरोनाची लागण

अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देदिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानी हिच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तर प्रदेश पॉवर डिपार्टमेंटच्या व्हिजिलन्स युनिटमधील तीन अधिका-यांना कोरोनाचे निदान झाले आहे. या तीन अधिका-यांमध्ये दिशाचे वडील जगदीश  पटानी यांचा समावेश आहे.

अ‍ॅडिशनल सीएमओ अशोक कुमार यांनी जगदीश  पटानी यांच्यासह तीन अधिका-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तीन अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर झोनल चीफ इंजिनिअर आॅफिस पुढील 48 तासांसाठी बंद करण्यात आले आहे. हे तिन्ही अधिकारी ट्रान्सफॉर्मर स्कॅमचा तपास करत होते.
दिशाचे वडिल हे उत्तर प्रदेशातील पॉवर डिपार्टमेंटच्या व्हिजिलन्स युनिटमध्ये डेप्युटी एसपी आहेत.
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगाल तर अलीकडे तिचा ‘बागी 3’ सिनेमा रिलीज झाला होता. लवकरच ती सलमान खानसोबत ‘राधे’ या सिपेमात झळकणार आहे.

दिशाने २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित होता. यानंतर दिशाने मागे वळून पाहिले नाही.त्याआधी ‘लोफर’ या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. यानंतर जॅकी चॅनसह ‘कूंग फू योगा’ या सिनेमात ती झळकली होती.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: actress disha patani father tested coronavirus positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.